जीएसटी गैरव्यवहारप्रकरणी तीन संचालकांना अटक

बनावट पावत्याांच्या सहाय्याने तीन हजार कोटी रुपयांचा व्यवहार दाखवला. त्याच्या सहाय्याने 520 कोटी रुपयांचा कर परतावा घेण्यात आल्याचा आरोप आहे

जीएसटी गैरव्यवहारप्रकरणी तीन संचालकांना अटक
SHARES

बनावट पावत्यांच्या सहाय्याने व्यवहार दाखवून ५२० कोटी रुपयांच्या वस्तू व सेवा कराचा(जीएसटी) अपहार केल्याप्रकरणी सुनील रत्नाकर गुट्टेला अटक करण्यात आली होती. त्याप्रकरणी आता ठाण्यातील एका कंपनीच्या तीन संचालकांना अटक करण्यात आली आहे. जीएसटी विभागाच्या मुंबई कक्षाने अटक केली. आरोपी संचलाकाची राजकीय पार्श्वभूमि असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचाः- महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही- उद्धव ठाकरे

सुनील हायटेक इंजिनिअरींग कंपनीचे संचालक सुनील रत्नाकर गुट्टेला १२ नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. बनावट पावत्याांच्या सहाय्याने तीन हजार कोटी रुपयांचा व्यवहार दाखवला. त्याच्या सहाय्याने ५२० कोटी रुपयांचा कर परतावा घेण्यात आल्याचा आरोप आहे.या फसवूकीतून फायदा घेणा-यांची यादी मोठी असून त्याचा तपास नवी दिल्ली, हैद्राबाद, लुधियाना, गुरुग्राम, मीरठ, अहमदाबाद, कोलकाता आदी विविध ठिकाणांपर्यंत पोहोचला आहे. पण आरोपीची कंपनी या व्यवहारातील मुख्य ऑपरेटर असल्याचे जीएसटी विभागाकडून सांगण्यात आले. याशिवाय आणखी एका कारवाईत श्री ओशिया फेरो अलॉय प्रा, लि. चे विजेंद्र रंका यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांनी १३७१ कोटी रुपयांचे नावट व्यवहार दाखवून २०९ कोटी रुपयांच्या जीएसटीचा परतावा घेतल्याचा आरोप आहे.

हेही वाचाः- मुंबई महापालिका करणार भटक्या श्वानांचं लसीकरण

याप्रकरणी चौकशीत गणेश बालमवार, विजय बायोने व वासुदेव जोशी या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी प्रोफाईल सिस्टीम अँड टेकनॉलॉजी प्रा. लि. संचालक आहेत. आरोपींच्या कंपनीने कोणत्याही वस्तू न देता ९ कोटी ३० लाख रुपयांच्या केवळ पावत्या दिल्या. तसेच सात कोटी १४ लाख रुपयांचे टॅक्स परतावा(आयटीसी) मिळवल्याचा आरोप आहे

संबंधित विषय