३ नायझेरियन तस्कर जेरंबद; कोकेन, हेराॅईन हस्तगत

जाॅन कॅनेडी (३६) हा नायझेरियन संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून अाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ १२५ ग्रॅम कोकेन आढळून आले. जाॅन हा सध्या नवी मुंबईमध्ये राहत अाहे.

३ नायझेरियन तस्कर जेरंबद; कोकेन, हेराॅईन हस्तगत
SHARES

मुंबईत सणासुदीला किंवा मोठ-मोठ्या कार्यक्रमात तरुणांना अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ३ तस्करांना अंमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) अटक केली अाहे.  त्यांच्याकडून कोकेन, हेराॅईन अादी लाखो रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली.  


१२५ ग्रॅम कोकेन हस्तगत

अंधेरीत बीएमसीच्या 'के' वार्ड येथे एक नायझेरियन तस्कर १२ लाख रुपयांच्या कोकेनची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी जाॅन कॅनेडी (३६) हा नायझेरियन संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून अाले.  पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ १२५ ग्रॅम कोकेन आढळून आले.  जाॅन हा सध्या नवी मुंबईमध्ये राहत अाहे. त्याच्या चौकशीतून अन्य आरोपींचाही पोलिसांनी शोध लावला.


पिसीड्योफेड्रीन हस्तगत

शुक्रवारी एएनसीच्या घाटकोपर युनिटने घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथून मानझार दी मोहद शेख (४३) याला ताब्यात घेतले. पोलिसांना त्याच्याजवळून ८ लाख ९० हजार रुपयांचे हेराॅईन हस्तगत केले. शेख हा गोवंडी परिसरात राहणारा आहे. त्यानंतर सोमवारी पुन्हा एएनसीच्या पोलिसांनी एलबीएस मार्गावर सापळा रचला होता. त्या ठिकाणी अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या इरफान यासीन शेख (३६) याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याजवळून २ किलो पिसीड्योफेड्रीन अंमली पदार्थ हस्तगत केले आहे.


खरेदीस परवानगी अावश्यक

एफिड्रीन आणि पिसीड्योफेड्रीन हे अंमली पदार्थ मोठ्या प्रयोगशाळांत वापरले जातात. मात्र, ते हाताळण्यासाठी परवाना लागतो. तसंच या अंमली पदार्थांच्या खरेदीसाठी ही परवानगी घेणे गरजेचे असते.  मात्र तस्कर तरूणांना हे अंमली पदार्थ पुरवत असल्याने तरूण नशेच्या अाहारी जात असल्याचं दिसून येत अाहे. 



हेही वाचा - 

मुंबई सेंट्रल स्थानकात विद्यार्थिनींशी गैरर्तन, विकृताला तात्काळ अटक

भाजपा पदाधिकाऱ्याची कारमध्ये जाळून घेत अात्महत्या




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा