का घेतला नातवानंच सख्ख्या आजीचा जीव?

का घेतला नातवानंच सख्ख्या आजीचा जीव?
का घेतला नातवानंच सख्ख्या आजीचा जीव?
See all
मुंबई  -  

पालघर - आपल्याच आजीची आणि तिच्या मैत्रिणीची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या विकृताला पोलिसांनी अटक केली असून त्याला 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पालघरच्या डहाणू तालुक्यातील दसरापाडात ही धक्कादायक घटना घडली. यामध्ये तिसऱ्या एका महिलेवर देखील हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली.

या आरोपीचं नाव विकास पवार असं आहे. सोमवारी संध्याकाळी सात वाजेदरम्यान विकासने त्याची आजी मैनी पवार आणि तिची मैत्रीण गिरजी पवार यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. तर यामध्ये तिसऱ्या महिलेला गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांनी त्याला पकडत त्याचे हातपाय बांधले. 

नंतर त्यांनी याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीला 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र आरोपीने आजी आणि तिच्या मैत्रिणीची हत्या का केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.