इंटरनेटच्या मदतीने वेश्या व्यवसाय, ३ जणांना अटक

मुंबईच्या अंधेरी परिसरातील उच्चभ्रू वस्तीत इंटरनेटवर Mumbai Escort, VIP Celebrity, Hot GF या नावाने भारतीय आणि परदेशातील महिलांच्या मदतीने वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहीती गुन्हे शाखा १० च्या पोलिसांना मिळाली होती.

इंटरनेटच्या मदतीने वेश्या व्यवसाय, ३ जणांना अटक
SHARES

इंटरनेटवर  Mumbai Escort, VIP Celebrity, Hot GF या पेजद्वारे वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा १० च्या पोलिसांनी पर्दाफाश करून ३ जणांना अटक केली आहे.  गुल्ली नमन यादव (३३), संतोष व्ही यादव (३६), अशोक यादव (३८) अशी या तिघांची नावे असून यांच्या समीर यादव या साथीदाराचा शोध पोलिस घेत आहे. चौकशीत हे तिघे परदेशी महिलांनाही वेश्या व्यवसायात ढकलत असल्याचं समोर आलं आहे.

मुंबईच्या अंधेरी परिसरातील उच्चभ्रू वस्तीत इंटरनेटवर Mumbai Escort, VIP Celebrity, Hot GF या नावाने भारतीय आणि परदेशातील महिलांच्या मदतीने वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहीती गुन्हे शाखा १० च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस आरोपीच्या मागावर होते. आरोपीची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे आरोपींशी संपर्क साधला. अंधेरीच्या भगतसिंग काॅलनी, जेबीनगर येथील आखून हाॅटेल राॅयल ईलाइट येथे भेटण्याचं दोघांनी ठरवलं होतं. ठरल्याप्रमाणे पोलिसांनी पाठवलेला ग्राहक हाॅटेलमध्ये आरोपींना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी पोलिसांनी  तिन्ही आरोपींना रंगेहाथ पकडलं. या तिघांवर गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्यांना अटक करत दोन मुलींची सुटका केली आहे.

आरोपी मुलीच्या घरची हलाखीची परिस्थिती पाहून त्यांना या व्यवसायात खेचत पैशांचे आमीष दाखवायचे. त्यानंतर सोशल मिडियावर जाहिरात करून त्या खाली संपर्क करण्यासाठी मोबाइल नंबर टाकायचे. त्या मोबाइलवर संपर्क करणाऱ्यांना भारतीय आणि परदेशी महिलांचे फोटो पाठवून आकर्षित केलं जायचं. या व्यवहारात आरोपी निम्मी रक्कम स्वतःकडे ठेवून घ्यायचे. यापूर्वी अशा प्रकरणात तिन्ही आरोपींची नावे पुढे आली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा -

मूल पळवणाऱ्या महिलेला अटक, आठवड्यातील दुसरी घटना

नवरात्रौत्‍सव निमित्त मुंबई पोलीस सज्ज
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा