वृद्ध महिलेस मारहाण करणाऱ्या तीन मनसे कार्यकर्त्यांना अटक

मनसे उपविभाग प्रमुख विनोद अरगिळे यानं बोलताना म्हटलं की, या व्हिडीओमध्ये फक्त एकच बाजू दिसतेय. ती महिला आमच्या अंगावर धावून आली, असा आरोप त्यांनी केला आहे.

वृद्ध महिलेस मारहाण करणाऱ्या तीन मनसे कार्यकर्त्यांना अटक
SHARES

मुंबईतील (Mumbai) नागपाडा परिसरात गणपतीचा (Ganpati 2022) मंडप उभारण्यावरून एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 3 मनसे (MNS worker) कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजमनातून संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी (police) सांगितले की, आरोपी गणेश भक्तांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यासाठी पीडित महिलेच्या दुकानासमोर बांबू लावत होता. त्याला पीडित महिलेने विरोध केला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पीडित महिलेशी धक्काबुक्की केली.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत: महिलेशी संपर्क साधला आणि पोलिस ठाण्यात तिचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. आरोपी विनोद अरगिळे, राजू अरगिळे, संदीप लाड यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मनसे उपविभाग प्रमुख विनोद अरगिळे यानं बोलताना म्हटलं की, या व्हिडीओमध्ये फक्त एकच बाजू दिसतेय. ती महिला आमच्या अंगावर धावून आली. त्यानंतर तिनं अर्वाच भाषेत शिवीगाळही केली. याप्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच यापूर्वीही त्या महिलेविरोधात तक्रार केल्याचं मनसे पदाधिकाऱ्यानं सांगितलं.

तसेच, महिलेनं आमच्या अंगावर येऊन आमची कॉलर धरणं हे कोणत्या संस्कृतीत बसतं. तिनं आमच्या अंगावर धावून आली म्हणजे, आम्ही आमच्या बचावासाठी काहीच करायचं नाही का? आम्ही महिलांचा आदर करणं गरजेचं आहेच. पण त्यांनीही आमचा आदर राखणं गरजेचं आहे, असंही मनसे पदाधिकाऱ्यानं म्हटलं आहे.

त्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबद्दल उलटसुलट बोलत होत्या. त्या माझ्या अंगावर आल्या, त्यामुळं माझ्याकडून हे कृत्य घडलं. त्याबद्दल मी त्यांची जाहीर माफी मागायला तयार आहे. माझ्यावर जी कारवाई होईल त्यासाठी मी तयार आहे, असंही मनसे विभागप्रमुख विनोद अरगिळेनं म्हटलं आहे.



हेही वाचा

NIA कडून दाऊदवर 25 लाखांचे बक्षीस जाहीर

आदित्य ठाकरेंच्या नावाने फसवणूकीचा प्रयत्न, भामट्याविरोधात गुन्हा दाखल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा