कस्टम विभागाच्या जाळ्यात महिला


कस्टम विभागाच्या जाळ्यात महिला
SHARES

मुंबई - कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर सोन्याच्या छड्या घेऊन जाणाऱ्या महिलेला अटक केलीये. अगदी सफाईदारपणे छड्या एल्युमीनियम फॉईल मध्ये गुंडाळून बॅगच्या फ्रेममध्ये लावलेल्या. मात्र कस्टम विभागाला या कारस्थानाची टिप लागली, आणि त्यांनी या किर्थना प्रभाकर नावाच्या महिला प्रवाश्याची कसून तपासणी केली.
एकूण 600 ग्रॅम वजनाच्या या सहा छड्यांची किम्मत साडेसत्रा लाख रूपये आहे. प्रभाकर ही कोलंबो वरुन भारतात येत होती. या सगळ्या छड्या कस्टम विभागाने जप्त केल्या आहेत. तर गुरूवारी रात्री दुसरीकडे एका कारवाईत एअर इन्टेलिजनसने दोन महीलांकडून तब्बल एक किलो सोनं जप्त केलय. शबाना शमसुद्दीन आणि झोहरा सईद शौकत अशी या दोघींची नावे आहेत. त्या दुबई वरुन एअर इंडियाच्या एक्सप्रेस फ्लाईटने मुंबईला परतत होत्या. संशषावरून या दोघींची तपासणी केली असता त्यांनी घातलेल्या बुर्ख्यात तब्बल 994 ग्रॅम सोन्याचे दागीने लपवलेले आढळले. भारतीय बाजारात या दागीन्यांची किम्मत साडे सत्ताविस लाख रूपयांच्या घरात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय