SHARE

पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका विवाहितेने संशयग्रस्त पतीच्या छळाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली आहे. सुनीता उर्फ प्रिती पिंटू हुमन (28) असे या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पिंटू हुमन याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता आणि पिंटू हे दोघेही पालघरमध्ये रहात होते. मागच्या अनेक वर्षांपासून पिंटू आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हाेता. त्यावरून दोघांमध्ये दररोज खटके उडायचे. अखेर या छळाला कंटाळून सुनीताने विष पिऊन आत्महत्या केली. त्यानंतर सुनीताला तात्काळ मनोरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला विनोबा भावे रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक सोनवणे म्हणाले की, पिंटू याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर 306, 323, 504 कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 12 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या