अखेर IPS आणि SPS बदलीबाबत ठरलं एकदाचं

IPS आणि SPS बदलीवरून काही दिवसांपूर्वी मुंबईत मोठं नाराजी नाट्य घडले होते. खुद्द मुख्यमंत्र्यांची समजूत घालण्यासाठी शरद पवार आणि गृहमंत्र्यांना मातोश्रीवर जावे लागले होते.

अखेर IPS आणि SPS बदलीबाबत ठरलं एकदाचं
SHARES

IPS आणि SPS बदलीवरून काही दिवसांपूर्वी मुंबईत मोठं नाराजी नाट्य घडले होते. खुद्द मुख्यमंत्र्यांची समजूत घालण्यासाठी शरद पवार आणि गृहमंत्र्यांना मातोश्रीवर जावे लागले होते. अखेर या बदल्यांबाबत एकमताने निर्णय घेण्यात आल्याचे कळते. त्यानुसार आता बदल्यांची नवी यादी शुक्रवारी जाहिर करण्यात आली आहे. एखाद दुसरी जागाबदलली असून बाकी यादी तशीच आहे. 

हेही वाचाः- University Exams 2020: हा अहंकाराचा मुद्दा बनवू नका, परीक्षा घेण्यावरून आदित्य ठाकरेंची यूजीसीवर टीका

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील डाँक्टरांच्या खांद्याला खांदा लावून पोलिस ही मोठ्या शर्तीने शहरातील कायदा व सुव्यवस्था हाताळत आहेत. मागील अनेक दिवसांपासून अनेक आयपीएस आणि एसपीएस अधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा संपन्न झाला होता. मात्र कोरोनामुळे त्यास विलंब लागल्याने २ जुलै रोजी मुंबईतील १२ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले. सह पोलिस आयुक्त नवल बजाज यांच्या स्वाक्षरीने हे आदेश पारित करण्यात आले होते. मात्र दोन दिवसात असे काय घडले की, बजाज यांना त्यांनी पारित केले आदेश त्यांना त्यांच्यात स्वाक्षरीने मागे घ्यावे लागले. यादी मागे घेण्यामागे नाराजाचं मोठं राजकारण असल्याचे कळते.

हेही वाचाः- ठाण्यातील लॉकडाऊन वाढला, आता 'या' तारखेपर्यंत असणार सर्व बंद

अखेर आज IPS आणि SPS  अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत एकमत झाले आहे. त्यानुसार झोन-७ चे पोलिस उपायुक्त परमजित सिंग दाहिया यांच्या  जागी प्रशांत कदम यांची बदली करण्यात आली आहे. तर दाहियां यांची नियुक्ती झोन-३ येथे करण्यात आली आहे. तसेच पोर्ट झोनच्या पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांची बदली सायबर कक्ष येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी गणेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिदेंच्या रिक्त झालेल्या जागी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर झोन ११ चे पोलिस उपायुक्त मोहन दहिकर यांची बदली राखीव पोलिस दल (ताडदेव) या ठिकाणी करण्यात आली आहे. तर झोन ११ च्या ठिकाणी सायबर येथे पोलिस उपायुक्त असलेले विशाल ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आँपरेशन पदी असलेलेपोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांची झोन -५ च्या पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  तर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदी नंदकुमार ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा