Advertisement

ठाण्यातील लॉकडाऊन वाढला, आता 'या' तारखेपर्यंत असणार सर्व बंद

कोरोना रुग्णांचा वाझता आकडा पाहता ठाणे शहरातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

ठाण्यातील लॉकडाऊन वाढला, आता 'या' तारखेपर्यंत असणार सर्व बंद
SHARES

मुंबईसह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. ठाण्यात देखील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.  

ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी लॉकडाऊन संदर्भात आदेश दिले आहेत. ठाण्यात १२ जुलैपर्यंत असलेला लॉकडाऊन आता १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन १९ जुलैला सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे.


हेही वाचा : ठाण्यात ३१ ते ५० वयोगटात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण


ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कळवा, मुंब्रा, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ज्या ठिकाणी संसर्ग वाढला आहे. त्या भागात नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 50 हजारांवर पोहोचली आहे.

ठाणे शहरात २ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपासून १२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे आणखी काही कालावधीसाठी लॉकडाऊन वाढवणं गरजेचं असल्याचं महानगरपालिका आयुक्तांनी म्हटलं आहे.

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर ठाणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करावं लागेल, असं वक्तव्य पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं आहे.हेही वाचा

रुग्णालयातील किती खाटा रिक्त? रोज माहिती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नवी मुंबईत अनलाॅकनंतर कोरोना रुग्णसंख्या, मृत्यूदरात मोठी वाढ

संबंधित विषय
Advertisement