Advertisement

कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरातील २ लाख व्यक्तींचं विलगीकरण


कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरातील २ लाख व्यक्तींचं विलगीकरण
SHARES

मुंबईत कोरोनानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मुंबईतील विविध भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यानुसार, मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरात रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळं या परिसरात शर्थिच्या प्रयत्न करून येथील कोरोनाबाधितांच्या संपर्कात असलेल्या २ लाख २० हजार व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

कांदिवली, बोरिवली आणि दहिसर या उपनगरांमध्ये जून महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली होती. त्यामुळं कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी येथील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याची भूमिका पालिका आणि पोलिसांनी घेतली होती. तसेच रुग्ण सापडल्याने पूर्णत: अथवा अंशत: सील केलेल्या इमारतींमध्ये संसर्गाचा प्रसार होऊ नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली. त्याचबरोबर आरोग्य तपासणी, ताप तपासणी शिबीर आदी विविध उपक्रमांच्या माध्यमांतून रुग्णांचा शोध सुरू करण्यात आला.

सुमारे ४ लाख २६ हजार ५९७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील ४,०२२ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती, तर ३,०१२ जणांची चाचणी घेण्यात आली असून ८०९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. सुमारे ४१ हजार ४३९ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून १८३ जणांमध्ये प्राणवायू कमी असल्याचे तपासणीत निदर्शनास आले. तर १७४ ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती समोर आहे.

सध्यस्थितीत या भागातील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ सरासरी २६.५३ दिवसांवर पोहोचला आहे. मात्र, विविध उपाययोजनांमुळं रुग्णसंख्या वाढीवर हळूहळू नियंत्रण येऊ लागलं आहे. त्याशिवाय, या परिसरात सील केलेल्या सुमारे २ हजार इमारती आणि २२ प्रतिबंधित क्षेत्रे निर्बंधमुक्त करण्यात आली आहे. एकूण रुग्णसंख्येपैकी २,८५९ रुग्ण झोपडपट्ट्यांमध्ये, तर ५,३४९ रुग्ण इमारतींमध्ये सापडले आहेत.

कांदिवलीच्या झोपडपट्टय़ांमध्ये १,३७०, तर बोरिवलीतील इमारतींमध्ये २,५२९ रुग्ण सापडल्याचे निदर्शनास आले. या सर्व रुग्णांच्या संपर्कात तब्बल २ लाख २० हजार ५५८ जण आले होते. त्यापैकी ७२ हजार ०२४ जण अतिजोखमीच्या गटात, तर १ लाख ४८ हजार ५३४ जण कमी जोखमीच्या गटात होते. या सर्वाचा शोध घेण्यात पालिका यशस्वी झाली आहे. करोना काळजी केंद्र-१मध्ये १,५०५, तर करोना काळजी केंद्र-२मध्ये ३६९ जणांना दाखल करण्यात आले आहे.हेही वाचा - 

मास्क न लावताच घराबाहेर पडणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

मुंबईत आतापर्यंत ३ लाख ६४ हजार कोरोना चाचण्याRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा