रेल्वे कँटिनची तोडफोड आणि सामान लंपास

रेल्वे कँटिनची तोडफोड आणि सामान लंपास
See all
मुंबई  -  

कुर्ला - मुंबईच्या कुर्ला रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक 7 वर शनिवारी संध्याकाळच्या सुमारास रेल्वे कँटिनची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. 

संध्याकाळी 7 च्या सुमारास एका दिव्यांग प्रवाशानं कँटिनमधून समोसा विकत घेतला. मात्र त्याला समोस्यामध्ये केस दिसला. हे जेव्हा त्याने कँटिनमध्ये बसलेल्या मुलाला सांगितले तेव्हा त्या मुलाने या दिव्यांग प्रवाशाला अपशब्द वापरले. यावेळी आजूबाजूला असलेले प्रवासी या दिव्यांगाच्या मदतीला आले आणि त्यांनी रागात कँटिनची तोडफोड करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे हे प्रवासी एवढ्यावरच थांबले नाहीत तर काहींना कँटिनमधील सामानच चोरून नेले. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी हा सगळा प्रकार नियंत्रणात आणत दिव्यांग प्रवासी आणि वेंडरला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी वडाळा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.