वर्सोव्यात अभिनेत्रीवर चाकू हल्ला, आरोपी फरार

मुंबईतल्या वर्सोवा इथं राहणाऱ्या एका अभिनेत्रीवर चाकूनं प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

वर्सोव्यात अभिनेत्रीवर चाकू हल्ला, आरोपी फरार
SHARES

मुंबईतल्या वर्सोवा इथं राहणाऱ्या एका अभिनेत्रीवर चाकूनं प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मालवी मल्होत्रा असं या अभिनेत्रीचं नाव आहे. योगेश कुमार सिंह नावाच्या व्यक्तीनं मालवीला जबरदस्ती रोखण्याचा प्रयत्न केला आणि चाकूनं मालवीवर हल्ला केला. या घटनेनंतर आरोपी फरार असून अभिनेत्री मालवीवर उपचार सुरू आहेत.

अनेक टीव्ही मालिका, चित्रपट आणि अ‍ॅड फिल्ममध्ये काम करणार्‍या अभिनेत्री मालवी मल्होत्रावर २६ ऑक्टोबरच्या रात्री मुंबईच्या वर्सोवा भागात हल्ला झाला. वास्तविक मालवी एका भेटीनंतर वर्सोवा इथल्या सीसीडीमधून घरी परतत होती.

त्याचवेळी योगेश कुमार नावाचा एक माणूस ऑडी कारमध्ये आला. त्याने मालवीला गाडीत बसण्यास सांगितलं. मालवीनं नकार देत पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. त्यानंतर योगेशनं मालवीवर चाकूनं ३ वेळा हल्ला केला. आरोपीला मालवीचा चेहरा खराब करायचा होता.

अभिनेत्री मालवी मल्होत्राला अंधेरी इथल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिथं तिच्यावर उपचार सुरू आहेत. मालवी मल्होत्रा यांनी महिला आयोग आणि कंगना रनौत यांच्या मदतीसाठी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाकडून मोबाइल व्हिडिओद्वारे संदेश जाहीर केला आहे.

मालवी म्हणाली की, "मीही हिमाचल प्रदेशातील मंडी इथली आहे, कंगना यांचे मूळ शहर. मला असे वाटत नव्हते की माझ्यावर मुंबईत असा हल्ला होईल. मला पाठिंबा द्या."

मालवीच्या गार्डीयननं एबीपी न्यूजला सांगितलं की, "हल्लेखोर योगेश सिंग हा २०१९ पासून मालवीचा मित्र आहे. दोघांची सोशल मीडियावर भेट झाली. योगेश म्युझिक व्हिडिओ बनवायचा असल्यानं कामाच्या संदर्भात तो मालवीला भेटला. बैठकीनंतर योगेशनं मालवीशी लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्याला मालवी यांनी नकार दिला.

काही दिवसांपूर्वी मालवी ब्रँड शूटसाठी दुबईला गेली होती. दुबईहून परत आल्यानंतर आरोपींनी मालवीचा पाठलाग केला. पण मालवीनं भेटण्यास नकार दिला. पण सोमवारी रात्री आरोपींनी चाकूनं मालवीवर ३ वेळा हल्ला केला आणि तिला गंभीर जखमी केले."

जखमी मालवीनं टीव्ही फिल्म इंडस्ट्रीतील तिचा मित्र प्रशांत बजाज यांना फोन करून सांगितलं की, तिच्यावर चाकूनं हल्ला करण्यात आला आहे. प्रशांत म्हणाला, "आरोपी योगेशनं काही म्युझिक व्हिडिओ बनवले आहेत, पण सोशल मीडियावर लोक योगेशकडे पैसे मागताना दिसत आहेत."

मालवीचे गार्डीयन अतुल पटेल म्हणाले की, मालवी मल्होत्रानं अनेक हिंदी चित्रपट, दक्षिण चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. ब्यूटी प्रॉडक्ट कंपनीसाठी जाहिरातही शूट केली आहे.

उडान नावाचा टीव्ही शो, हॉटेल मिलान नावाचा हिंदी चित्रपट, ओडिक्कू ओंडी नावाचा तमिळ चित्रपट यासारख्या बर्‍याच चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी ब्युटी प्रॉडक्ट, ज्वेलरी प्रॉडक्ट, हेअर प्रॉडक्ट अशा अनेक कंपनीच्या जाहिरातींचं शूटही केलं आहे.

मुंबई पोलिसांचे डीसीपी चैतन्य एस म्हणाले, "वर्सोवा पोलिसांनी रात्री अभिनेत्रीवर झालेल्या हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे." पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घटनेनंतर फरार आहे.



हेही वाचा

नवी मुंबई : कुत्रीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक

TRP Scam: पाच गुंतवणूकदारांची होणार चौकशी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा