एसीबीच्या दिवसभरात दोन कारवाई, चौघांना अटक

लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) मंगळवारी मुंबईत दोन कारवाया करून चौघांना अटक केली.

एसीबीच्या दिवसभरात दोन कारवाई, चौघांना अटक
SHARES

मुंबईवर कोरोना संक्रमणात एसीबीच्या कारवाईंना ब्रेक लागला होता. मात्र अनलाँकडाऊन ५ सुरू होताच, भ्रष्ट अधिकार्यांनी पून्हा खिसे भरण्यास सुरूवात केली. याचाच प्रत्यय एसीबीच्या दोन कारवाईतून येतो. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) मंगळवारी मुंबईत दोन कारवाया करून चौघांना अटक केली.

हेही वाचाः-  बेस्ट समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेची बाजी

पहिल्या कारवाईत एसीबीने शिवाजी पार्क येथे रचलेल्या सापळ्यात महापालिका जी-नॉर्थ विभागातील मुकादम सुभाष राऊत व वाहन स्वच्छक वासवानी नौकुडकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदार यांचे धारावी ६० फुट परिसरातील राहत्या घराचे दुरूस्ती काम सुरू होते. हे काम अनधिकृत असल्यामुळे राऊत यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने याप्रकरणी एसीबीकडे तक्रार केली. त्यावेळी पडताळणीत राऊत यांनी लाचेची रक्कम मागितली व त्यातील २० हजार रुपये स्वीकारले. ही रक्कम राऊत याने स्वीकारली व नौकुडकर यांच्याकडे दिली. नौकुडकर यांची त्याच्या खिशात रक्कम ठेवल्यानंतर एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले. आणखी एका कारवाईत मुलुंड तहशीलदार परिसरात रचलेल्या सापळ्यात खासगी दलालासह दोघांना अटक केली. सॉल्वसी प्रमाणपत्र देण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा