फेसबुकवर कर्ज देण्याची पोस्ट टाकून फसवणूक, दोघांना अटक

कमी ठेवींवर कर्ज देण्याची जाहिरात या दोघांनी फेसबुकवर केली होती. त्यानुसार गरजू लोकांनी या दोघांशी संपर्क करण्यास सुरूवात केली.

SHARE

फेसबुकवर कर्ज देण्याची जाहिरात पोस्ट करून गरजू लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी अभिषेक सुर्वे(३८) आणि सिद्धेश मांजरे(३१) या दोघांना अटक केली आहे. या दोघांनी दादर, काळाचौकी, खार परिसरात राहणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे.


महिलेची तक्रार

कमी ठेवींवर कर्ज देण्याची जाहिरात या दोघांनी फेसबुकवर केली होती. त्यानुसार गरजू लोकांनी या दोघांशी संपर्क करण्यास सुरूवात केली. कर्ज देण्याच्या बहाण्याने एका महिलेची या दोघांनी १ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्यानंतर तिने सायबर पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानंतर सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली. त्यावेळी चौकशीत अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे पुढे आले. पोलिसांनी या दोघांना सोमवारी अटक केली. या दोघांविरोधात फसवणूक, विश्‍वासघात करणे व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादर, काळाचौकी व खारमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा सायबर पोलिसांना संशय आहे.हेही वाचा -

डाॅ. पायल आत्महत्या: तिन्ही आरोपी डाॅक्टरांचं निलंबन

अनुराग कश्यपच्या मुलीबाबत सोशल मीडियावर अश्लील कमेंट, ओशिवरा पोलिसात गुन्हासंबंधित विषय
ताज्या बातम्या