शस्त्रास्त्रं विकण्यासाठी अालेल्या दोघांना अटक


शस्त्रास्त्रं विकण्यासाठी अालेल्या दोघांना अटक
SHARES

मुंबईच्या प्रिन्सेस स्ट्रिट परिसरात शस्त्रास्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन सराईत चोरांना एल.टी.मार्ग पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी दोन परदेशी बनावटीची पिस्तुले, एक भारतीय बनावटीचे पिस्तु, एक देशी कट्टा अाणि अनेक जिवंत काडतुसे जप्त केली अाहेत. हे दोघेही गुन्हेगारी टोळीच्या संपर्कात असल्याचे तपासात उघडकीस आले असून पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत.


यूपीतून मुंबईत यायचा शस्त्रसाठा

उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे राहणारे आरोपी मोहम्मद शफी रियाज मोजान आणि अल्लाउद्दीन उर्फ अरमान बंधू सैफी हे उत्तर प्रदेशमधून शस्त्रसाठा अाणून मुंबईत विकायचे. नुकतेच हे दोघे वर्धमान चौकाजवळील प्रिन्सेस स्ट्रिट परिसरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती लोकमान्य टिळक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद नाईक व संजय मोहिते यांना मिळाली. त्यांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला होता.



मोठा शस्त्रसाठा सापडला

शफी आणि अरमान या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी दोघांकडे मोठा शस्त्रसाठा सापडला. याप्रकरणी दोघांवर शस्त्रबंदी कायद्याचे उल्लघंन आणि अनधिकृतरित्या शस्त्रांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात अाला अाहे. या दोघांनी ही शस्त्रे कुठून आणली, अन्य किती जणांना आतापर्यंत शस्त्रे विकली, याचा पोलीस शोध घेत आहेत.


हेही वाचा -

मुंबईत फिरतायत अनेक नीरव मोदी!

तब्बल दोन वर्षांनंतर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा