तब्बल दोन वर्षांनंतर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर

दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने शुक्रवारी दुपारी मंजूर केला.

तब्बल दोन वर्षांनंतर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर
SHARES

दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अाणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने शुक्रवारी दुपारी मंजूर केला. त्यामुळे तब्बल २ वर्षांनी भुजबळ आता तुरुंगातून बाहेर येणार आहेत. त्यांच्यावरील पीएमएलए कायद्याचे ४५(१) हे कलम नुकतेच रद्द करण्यात आल्यानंतर भुजबळांनी संधीचा फायदा घेत आपली जामीनावर मुक्तता करावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती.


२ एप्रिलला जामीनासाठी अर्ज

छगन भुजबळ यांनी २ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. आपण गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहोत. माझे वय ७१ असून शरीर साथ देत नाही. मी आजारपणाने त्रस्त असून मला उपचाराची गरज आहे. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपली जामीनावर सुटका करावी, अशी विनंती त्यांनी या अर्जाद्वारे उच्च न्यायालयात केली होती. त्यावर शुक्रवारी उच्च न्यायालयाने सुनावनी दरम्यान भुजबळांचा जामीन मंजूर केला.


दोन वर्षांनंतर बाहेर येणार

या पूर्वी छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. पण सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने त्यांनीही हायकोर्टात धाव घेतली होती. दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार आणि आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) भुजबळांना १४ मार्च २०१६ रोजी रात्री अटक केली होती. तब्बल दोन वर्षांनी अाता छगन भुजबळ बाहेर येणार आहेत.


राज्याबाहेर जाता येणार नाही

छगन भुजबऴ यांना जामीन मंजूर झाला असला तरी त्यांना महाराष्ट्राबाहेर जाता येणार नाही. जर राज्याबाहेर जायचं असेल तर त्यांना उच्च न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागणार अाहे. त्याचबरोबर जेव्हा ईडी त्यांना चौकशीसाठी बोलावेल, त्यावेळी त्यांना हजर राहावं लागणार अाहे.


हेही वाचा -

छगन भुजबळ केईएम रूग्णालयात दाखल

भुजबळांचं बरं-वाईट झाल्यास सरकार जबाबदार- पवार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा