दारूच्या नशेत मस्ती आणि मस्तीतून झाली हत्या

  मुंबई  -  

  नालासोपारा - शिर्डीनगर परिसरात मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. शुभम भिसे आणि सम्राट पावसकर या दोघांनी 20 वर्षीय प्रतिक कदम या युवकाची हत्या केली. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. सोमवारी सकाळी हा प्रकार घडला.

  प्रतिक, शुभम आणि सम्राट हे तिघे मित्र होते. रविवारी रात्री 2 वाजता बिल्डींगच्या टेरेसवर दारू प्यायला बसले. सकाळी 6 वाजता बिल्डींगच्या खाली असलेल्या पाणटपरीवर सिगरेट प्यायला उतरले. त्यावेळी प्रतिकने शुभम भिसेच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले. यावरून दोघांच्यात मारामारी झाली. सम्राटनेही प्रतिकची साथ देत शुभमला मारण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात दोघांनी शुभमला रस्त्यावर पाडले आणि त्याच्या डोक्यात दगड घातला. यात शुभमचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघा आरोपींना अटक केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.