भाजप आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

पिकनिकहून येणाऱ्या दुचाकीवरील तरुण तरुणीचा या अपघातात जागीच मृत्यू झाला,

भाजप आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू
SHARES

भाजपचे कल्याण येथील मुरबाड मतदार संघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात कथोरे हे थोडक्यात बचावले असून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कल्याण तालुकातील अनखर पाडा येथील रस्त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आटोपून बदलापूरकडे येत असताना संध्याकाळी पावणे सातच्या सुमाराला हा अपघात झाला.

हेही वाचाः- महापालिकेची विशेष पथकं ठेवणार नाईट क्लबवर नजर

रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपून किसन कथोरे हे अनखर पाडा गोवेली वाहोली मार्गे बदलापूरकडे येत होते. यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या गाडीला धडक दिली. पिकनिकहून येणाऱ्या दुचाकीवरील तरुण तरुणीचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती आहे. अमित सिंग आणि सिमरन सिंग अशी मृतांची नावे आहेत. हे कल्याणच्या नेतीवली परिसरातील राहणारे होते. या अपघातात कथोरे किरकोळ जखमी झाले होते. एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात कथोरे यांचे अंगरक्षक, स्वीय साहाय्यक सुखरूप आहेत. या अपघाताची माहिती होताच कथोरे यांच्या समर्थकांमध्ये एकच खळबळ माजली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा