पोटमाळा कोसळून दोघांचा मृत्यू, साकीनाका परिसरातील घटना

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून मोहम्मद अब्दुल गफार शेख, अबरार अहमद कारी अब्दुला खान या दोघांना बाहेर काढून त्यांना जवळील शासकिय रुग्णालयात दाखल केले

पोटमाळा कोसळून दोघांचा मृत्यू, साकीनाका परिसरातील घटना
SHARES

साकीनाका परिसरात लोखंडी राॅडने भरलेला पोटमाळा कोसळल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या दुर्घटनेत दुकानात असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद अब्दुल गफार शेख, अबरार अहमद कारी अब्दुला खान अशी या दोन मृतांची नावे आहेत. या प्रकरणी साकीनाका पोलिस ठाण्यात दुकानाचे मालक याच्या विरोधात निष्काळजी पणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचाः- दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव गुण

अंधेरी कुर्ला रोडवर लोखंडी राॅडचे हे दुकान होते. या दुकानातील पोट माळ्यावर प्रमाणापेक्षा जास्त राॅड धोकादायक परिस्थितीत ठेवण्यात आले होते. या दुकानात मृत मोहम्मद अब्दुल गफार शेख, अबरार अहमद कारी अब्दुला खान आणि कुरबान अली नवासअली शेख हे कामाला होते. मंगळवारी जेवण झाल्यानंतर दुकान बंद करून हे दुकानात बसले असताना. मध्यरात्री दीडच्या सुमारास अचानक पोटमाळा कोसळला. त्यावेळी पोटमाळ्याखाली बसलेले मोहम्मद अब्दुल गफार शेख, अबरार अहमद कारी अब्दुला खान हे दोघे त्याखाली सापडले. पोटमाळा कोसळल्याच्या आवाजाने शेजारील दुकानातील कर्मचाऱ्यांनी दुर्घटनाग्रस्त दुकानाच्या दिशेने धाव घेतली.

हेही वाचाः- मुंबईतील 'इतक्या' इमारती टाळेबंदीतून मुक्त

तर उपस्थितांपैकी एकाने पोलिस नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन दलाला पाचरण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून मोहम्मद अब्दुल गफार शेख, अबरार अहमद कारी अब्दुला खान या दोघांना बाहेर काढून त्यांना जवळील शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डाँक्टरांनी घोषित केले. तर दुकानात असलेले कुरबान अली नवासअली शेख  यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ३०४ (अ), ३३६,३३७ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा