ड्रंक अॅण्ड ड्राइव्हमध्ये दोघे जखमी

 Bandra Reclamation
ड्रंक अॅण्ड ड्राइव्हमध्ये दोघे जखमी

वांद्रे - वांद्रे रेक्लमेशन परिसरात एका गाडीचा अपघात झाला. अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार कारचा टायर फुटल्याने अपघात झाला. ही कार वरळीहून वांद्रे येथे येत होती. रेक्लमेशनला पोहोचताच कारचा टायर फुटला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारमधील दोघं दारु पिऊन गाडी चालवत होते. पोलिसांनी याप्रकरणी निष्काळजीपणा करत गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading Comments