• अपहरण झालेल्या दोन तरुणांची सुटका
SHARE

मुलुंडमधील अपहरण झालेल्या दोन तरुणांची सुटका करण्यात मुलुंड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मनिष ठाकूरसह, जनप्रकाश पुरोहित, सिद्दीक राहिन प्रसन्ना कुमार, आणि हितेश पटेल या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मुलुंडमध्ये राहणाऱ्या सुनील मच्छर आणि त्याचा मित्र भरतकुमार सिराई यांनी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नोटबंदीनंतर वसई येथील जनप्रकाश पुरोहित आणि हितेश पटेल यांच्याकडून 1 कोटी 13 लाखांच्या जुन्या नोटा बदली करण्यासाठी घेतल्या होत्या. त्यानंतर या नोटा या दोघांनी अन्य तरुणांकडे दिल्या. मात्र या नोटा मिळाल्यानंतर या सर्वांनी पोबारा केला. सहा महिन्यानंतर देखील पैस न मिळाल्यानं हितेश आणि जनप्रकाश यांनी या दोघांचे शुक्रवारी अपहरण करुन त्यांना वसईतील एका कार्यालयात डांबून ठेवले होते. तसेच यावेळी आरोपींनी सुनील याच्या भावाकडे फोन करत तात्काळ 1 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. सुनीलच्या भावाने त्वरित मुलुंड ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी छापा घालत अवघ्या दोन तासात वसई येथून तरुणांची सुटका केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या