पार्श्वभागातून सोन्याच्या बिस्किटांची तस्करी


पार्श्वभागातून सोन्याच्या बिस्किटांची तस्करी
SHARES

विमानतळावर सोन्याची तस्करी अगदी सर्रास केली जाते. त्यातही हे तस्कर सोन्याची तस्करी करण्यासाठी नेहमीच नव-नवीन मार्ग शोधत असतात. शनिवारी रात्री दुबईवरून आलेल्या दोघा श्रीलंकन नागरिकांनी त्यांच्या पार्श्वभागात लपवून सोन्याची तस्करी केल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जमीर अब्दुल वाहिद (42) आणि अल्ताफ साहूल हमीद (48) अशी या दोघांची नावे आहेत.

शनिवारी रात्री हे दोघेही प्रवासी अमिरात एअरलाईनच्या फ्लाईट इके 508 विमानाने मुंबईला उतरले असता संशयावरून कास्टमच्या अधिकाऱ्यांनी या दोघांची झडती घेतली आणि त्यांच्या अंगझडतीत पार्श्वभागात लपवलेली सोन्याची बिस्किटे मिळाली. जमीर वाहिद कडून कस्टम विभागाने पार्श्वभागात लपवलेली 13 बिस्किटे जप्त केली. 1516 ग्रॅम वजनाच्या या बिस्किटांची किंमत 45 लाखांच्या घरात आहेत तर अल्ताफ हमीदकडून कस्टमच्या अधिकाऱ्यांनी 12 सोन्याची बिस्किटे जप्त केली असून, पार्श्वभागात लपवलेल्या या 1399 ग्रॅमच्या बिस्किटांची किंमत 42 लाख रुपये आहे. हे दोघेही श्रीलंकेच्या पुथलंम जिल्ह्याचे रहीवाशी असून, ते नेहमी भारतात व्यवसायाच्या नावाखाली येत असल्याचं समोर आलं आहे.

दुसऱ्या एका कारवाईत कस्टम विभागाने दुबईवरून आलेल्या सय्यद नुरुलअमीन(26) नावाच्या प्रवाशाला अटक केली आहे. त्याच्याकडून कस्टमच्या अधिकाऱ्यांनी 17 लाखांचे सोन्याचे दोन बार जात केले आहेत. कस्टमच्या अधिकाऱ्यांची नज़र चुकवण्यासाठी या सय्यद नुरुलअमीनने हॅन्ड ज्यसरमध्ये हे सोन्याचे रॉड लपवून आणले होते. शुक्रवारी भटकळ, कर्नाटकचा रहिवाशी असलेला हा तरुण दुबईवरून मुंबईला उतराला. त्याला संशयावरून ताब्यात घेतलं असता त्याच्या सामानाच्या झडतीत हे सोनं कस्टमच्या हाती लागलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा