मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, दोघांना अटक

या बनावट ग्राहकाने तेथे असलेल्या नेहा आणि मोहम्मद रफिक यांच्याकडे तरुणींची मागणी केली. त्यांनी चार तरुणी दाखवून त्याच्याकडून ४ हजार रुपये घेतले. या बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी छापा टाकून या चार तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, दोघांना अटक
SHARES

मुंबईच्या पश्चिम उपनगरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांकडून होत असतानाही हे प्रकार थांबत नाहीत. नुकतेच वर्सोवा पोलिसांनी मसाज पार्लरच्या आड सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार मुलींची सुटका केली असून दोघांना अटक केली आहे.

अंधेरीतील वर्सोवा येथे रिफ्रेश वेलनस नावाच्या मसाज सेंटरमध्ये सेक्‍स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याबाबत शहानिशा करण्यासाठी वर्सोवा पोलिसांच्या विशेष पथकाने एक बनावट ग्राहक पाठवले होते. या बनावट ग्राहकाने तेथे असलेल्या नेहा आणि मोहम्मद रफिक यांच्याकडे तरुणींची मागणी केली. त्यांनी चार तरुणी दाखवून त्याच्याकडून ४ हजार रुपये घेतले. या बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी छापा टाकून या चार तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत तिथे वेश्‍या व्यवसाय चालत असल्याचे समोर आले. नेहा आणि मोहम्मद रफिक या तरुणींना ग्राहकांसोबत पाठवत असल्याचे उघडकीस आले.

या दोघांनाही पोलिसांनी "पिटा' कायद्यांतर्गत अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सुटका केलेल्या चार तरुणींना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. नेहा सय्यादला अशाच एका गुन्ह्यात आंबोली पोलिसांनी अटक केल्याचे उघड झाले. सध्या जामिनावर असलेल्या नेहाला "पिटा' कायाद्यांतर्गत दुसऱ्या गुन्ह्यात अटक झाली आहे. या गुन्ह्यातील अन्य काही आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.हेही वाचा -
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा