वसईत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकाला अटक

  Palghar
  वसईत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकाला अटक
  मुंबई  -  

  वसई तालुक्यातल्या विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. दोन क्रूर नराधमांनी एका 4 वर्षाच्या आणि 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरेगाव येथील इमारतीच्या परिसरात एक चार वर्षाची मुलगी खेळता-खेळता रडत घरी गेली आणि आपल्या पोटात दुखत असल्याचे तिने तिच्या आईला सांगितले. त्यावेळी आईने तिला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्या अल्पवयिनच्या गुप्तांगावर जखमेचे निशान आढळून आले. डॉक्टर आणि आईने तिच्याकडे विचारणा केली असता मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिच्या शेजारी राहणाऱ्या विकास (बदललेले नाव, 12) याने गैरप्रकार केल्याचे तिने आपल्या आईसमोर सांगितले. तेव्हा तिच्या आईने आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 376 आणि पोस्को या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

  अशाच प्रकारची दुसरी घटना नालासोपारा पश्चिम येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. एका 57 वर्षाच्या नराधमाने 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला एका इमारतीत नेत तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर मुलीच्या आईने आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात भादविं कलम 376,2 (टी), 377 आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 23 मे 2017 पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.