म्हणून अत्यावश्यक सेवेतील पोलिसांना करावे लागले ‘सेवेतून बडतर्फ’

वारंवार हजर राहण्याबाबत आदेश बजावून ही वर्षभरापासून सेवेत हजर न झालेल्या दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

म्हणून अत्यावश्यक सेवेतील पोलिसांना करावे लागले ‘सेवेतून बडतर्फ’
SHARES

देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राष्ट्रीय आपत्ती घोषीत केली असताना. अत्यावश्यक सेवा बजावणारे प्रत्येक व्यक्ती जिवाची बाजी लावून या महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी धडपडत आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्म चाऱ्यांच्या सुट्या या रद्द करण्यात आल्या असून त्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. असे असताना ही, प्रशासनाच्या आदेशाचे उल्लघंन करत, वारंवार हजर राहण्याबाबत आदेश बजावून ही वर्षभरापासून सेवेत हजर न झालेल्या दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे ८०६ नवे रुग्ण, ६४ जणांचा दिवसभरात मृत्यू

 कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून राज्यात पोलिस कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यात महत्वाची भूमिका साकारत आहे. लॅकडाऊनच्या काळात सर्व सामान्यांची मदत करण्यासाठी किंवा त्यांना बाहेर प़डण्यापासून रोखण्यासाठी पोलिस दिवस रात्र झटत आहेत. आधीच पोलिस आयुक्तांनी ५५ वर्षावरील पोलिसांना कोरोना प्रादुर्भावामुळे घरी बसवले आहे. त्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात उर्वरित पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण वाढत आहे. असे असताना ही, वारंवार नोटीस बजावून देखील अशा परिस्थितीत गैरहजर राहणाऱ्या ६ पालिस कर्मचाऱ्यांवर बोरिवली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून काही दिवसांपूर्वी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१, चे कलम १४५ आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ कलम ५६ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक पोलिस नाईक व पाच पोलिस शिपायांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात एका महिला पोलिस शिपायाचाही समावेश आहे.

हेही वाचाः- violating lockdown in Maharashtra नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी १ लाख ५४ हजार जणांवर गुन्हे दाखल

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत केले आहे. अशात सर्व पोलिसांच्या सुट्या रद्दकरून त्यांना कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे असताना ही, काही वारंवार हज राहण्याचे आदेश बजावून ही पोलिस कर्तव्यावर हजर झाले नाही. तर काही पोलिस वाले न कळवताच कित्येक वर्षांपासून गैरहजर होते. अशांना आता सेवेतून थेट बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्या अनुषंगाने सेवेतून दोन पोलिसांना बडतर्फ करण्यात आले आहे. यातील एक पोलिस शिपाई हा २००९ पासून  गैरहजर असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरा पोलिस शिपाई २०१८ पासून गैरहजर आहे.  हे दोघांचीही नेमनूक ताडदेव सशस्त्र पोलिस दलात होती. या दोघांना वारंवार हजर राहण्याबाबतचे आदेश पाठवून ही त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे उत्तर न मिळाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा