महामार्गावर बंदुकीच्या धाकावर ट्रक लुटणारे आरोपी अटकेत

मुंबईतून विदर्भ आणि मराठवाडा परिसरात जाणाऱ्या महामार्गावर मागील अनेक दिवसांपासून ट्रक चालकांना लुटण्याच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे नोंदवूनही हे सराईत आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हते.

महामार्गावर बंदुकीच्या धाकावर ट्रक लुटणारे आरोपी अटकेत
SHARES

मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने दोन सराईत आरोपींना सांताक्रूझ परिसरातून देशी कट्टा आणि जिवंत काडतुसासह अटक केली आहे. हमीद मोहम्मद शरीफ खान (२८), जावेद नईमुद्दीन शेख (४१) अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांवर अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


सापळा रचला

मुंबईतून विदर्भ आणि मराठवाडा परिसरात जाणाऱ्या महामार्गावर मागील अनेक दिवसांपासून ट्रक चालकांना लुटण्याच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे नोंदवूनही हे सराईत आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हते. दरम्यान या प्रकरणात हात असलेलेे दोन सराईत आरोपी सांताक्रूझच्या एका बारमध्ये येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गुरूवारी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. 


इनोव्हा कार हस्तगत

या दोघांजवळून पोलिसांनी एक देशी कट्ट्यासह जिवंत काडतूस आणि एक इनोव्हा कार हस्तगत केली. पोलिस चौकशीत या दोघांनी गुन्ह्यांची कबुली दिली. तसंच काही दिवसांपूर्वी या दोघांनी धुळे आणि जळगाव महामार्गावर बेसनच्या पीठाने भरलेला ट्रक बंदुकीच्या धाकावर लुटून ट्रकमधील चालकाला मारहाण केली होती. तसंच हा ट्रक पळवून आणत दोघांनी तो भिवंडी येथील गोडाऊनमध्ये रिकामी केल्याची कबुली दिली आहे.  त्यानुसार पोलिसांनी दोघांवर भारतीय हत्यार कायदा ३,२५ आणि १३५ म.पो.का कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. एटीएम मशीनबाहेर वृद्धांना पैसे काढून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यातही हे दोघे तरबेेेज असल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा -

स्टंटबाजांचा पुन्हा मुंबईच्या रस्त्यांवर धुमाकूळ; ११ दुचाकी जप्त

परदेशी तरुणाला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा