पूर्व मुक्त मार्गावर अपघात

 Sewri
पूर्व मुक्त मार्गावर अपघात
पूर्व मुक्त मार्गावर अपघात
पूर्व मुक्त मार्गावर अपघात
पूर्व मुक्त मार्गावर अपघात
See all

शिवडी - पूर्व मुक्त मार्गावर अतिवेगात धावणाऱ्या एका होंडा सिटीच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रविवारी शिवडीजवळ अपघात झाला. अपघातात दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सीएसटीकडून चेंबूरला जाणाऱ्या होंडा सिटी कारचे वाहनचालक अमित मोतवाणी यांचं नियंत्रण सुटल्यानं गाडी थेट दुभाजकाच्या लोखंडी पत्र्यात घुसली. जखमींना उपचारासाठी भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती वडाळा वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता नाशिककर यांनी दिली.

Loading Comments