मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणी दोघे निलंबित


मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणी दोघे निलंबित
SHARES

मुंबईतल्या भायखळा येथील कारागृहातील भ्रष्टाचार आणि मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणी कारागृह अधीक्षक तानाजी घरबुडवे, प्रभारी अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर यांना दोषी ठरवण्यात आले आहे. याचसोबत त्यांचे निलंबनही करण्यात आल्याची माहिती गृह राज्यमंत्री (शहरे) रणजित पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुंबईतील भायखळा येथील कारागृहातील भ्रष्टाचार आणि मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणाबाबत लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना रणजित पाटील यांनी निलंबित केल्याची माहिती दिली.


एसआयटीमार्फत चौकशी सुरू

या प्रकरणाबाबत एसआयटीमार्फत चौकशी केली जात आहे. 302 अन्वये सहआरोपी म्हणून स्वाती साठे यांची गंभीर दखल घेतली. आता स्पेशल आयजीमार्फत चौकशी करून 7 दिवसांच्या आत यावर निर्णय घेण्यात येईल. हे प्रकरण गंभीर असून, याबाबत न्यायालयीन चौकशी करून कारवाई करण्यात येईल. तसेच विधान मंडळाची समिती स्थापन केली जाईल. येणाऱ्या काळात ज्या समस्या निर्माण होणार आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

या लक्षवेधीमध्ये भाई जगताप, संजय दत्त, नीलम गोऱ्हे, जोगेंद्र कवाडे, विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला.


हेही वाचा -

मंजुळा शेट्ये प्रकरणाचा सूत्रधार सरकारमध्येच?


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा