मसाजच्या नावाखाली दागिन्याांची चोरी

मसाजच्या नावाखाली मौल्यवान दागिन्याांची चोरी करणाऱ्या दोन महिलांंना आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

मसाजच्या नावाखाली दागिन्याांची चोरी
SHARES

मसाजच्या नावाखाली मौल्यवान दागिन्याांची चोरी करणाऱ्या दोन महिलांंना आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अश्विनी बोरसे (५०), अनुसया मोरे (६०) अशी या दोघींची नावे आहेत. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस अधिक तपास करत आहे.


मसाजचा बहाणा 

सातरस्ता परिसरात राहणाऱ्या तक्रारदार छाया हरी नवले यांची आई रुक्मिणी पवार (९०)  या त्यांच्या सातरस्ता परिसरातील घरासमोर बसलेल्या असताना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दोन महिला त्यांच्याकडे आल्या. त्यांनी रुक्मिणी पवार यांना त्यांच्या मानेला मसाज करून देतो असं सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. दोघींनी मसाज करताना रुक्मिणी यांच्या गळ्यातील दागिने चोरून पळ काढला. या प्रकरणी  छाया नवले यांनी आग्रीपाडा पोलिसांकडं तक्रार नोंदवली.  


अनेकांंना लुटलं 

त्यानंतर पोलिसांनी या महिलांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. आश्विनी अशोक बोरसे ही मरीअम्मा झोपडपट्टी, जीजामाता, वरळी येथे राहते.  तर अनुसया शंकर मोरे ही महिला महाराष्ट्र नगर, बांद्रा येथे राहते.  दोघांनी अशा प्रकारे अनेकांंना लुटले असल्याची माहिती पुढे आली आहे.


हेही वाचा  -




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा