ट्रेनमध्ये मोबाईल चोरणाऱ्या दोन महिला चोरांना अटक


ट्रेनमध्ये मोबाईल चोरणाऱ्या दोन महिला चोरांना अटक
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या दोन महिला चोरांना अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं आहे. टिंकल जयराय सोनी (२०) आणि टिनल जयंतीलाल परमार (१९) अशी या मोबाईल चोरांची नावं अाहेत. ३० मे रोजी कांदिवली रेल्वे स्थानकात महिला डब्यासमोर दुपारी १ वाजता सापळा रचून पोलिसांनी या महिला चोरांना रंगेहाथ पकडलं. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी बोरीवली पोलीस ठाण्यात या चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.


९ महागडे मोबाईल जप्त

कांदिवली रेल्वे स्थानकात दोन महिला एका महिला प्रवाशाच्या खिशातून मोबाईल फोन चोरी करत होत्या. त्यावेळी रेल्वे पोलिसांनी या दोन महिला चोरांना रंगेहाथ अटक केली. पोलीस ठाण्यात या महिलांची अधिक चौकशी केली असता, त्यांच्याकडून ९ महागडे मोबाईल जप्त केले आहेत. या सर्व मोबाईलची एकूण किंमत १ लाख रुपये इतकी आहे. या चोरट्यांविरोधात पोलिसांनी कलम ३७९, ३४ भादंविअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


चोरीचे मोबाईल ३ लाखांना विकले

लोकलमध्ये मोबाईल चोरल्यानंतर या दोन महिलांनी चोरलेले मोबाईल राहुल तगाजी राज पुरोहित (२८) याला ऋषी करमवीर सिंगच्या मदतीनं विकले होते. याप्रकरणी राहुलची चौकशी केली असता, त्याच्याकडून तब्बल ३ लाख रुपयांचे वेगवेगळ्या कंपनीचे एकूण १९ मोबाईल आणि ३० मेमरी कार्ड पोलिसांनी जप्त केली अाहेत.


हेही वाचा -

अभिनेता अरमान कोहलीची गर्लफ्रेंडला मारहाण, गुन्हा दाखल

होय, मी बेटिंग केलं - अरबाझ खानची कबुली

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा