कुख्यात गुंड रवि पुजारी भारतात दाखल

खंडणी आणि हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांत १५ वर्षांपासून तो पोलिसांना हवा होता.

कुख्यात गुंड रवि पुजारी भारतात दाखल
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन म्हणून एकेकाळी ओळख असलेला फरार कुख्यात गुन्हेगार रवी पुजारी याचा ताबा भारताला िमळाला आहे. सोमवारी सकाळी कर्नाटक पोलिस त्याला घेऊन भारतात दाखल होत आहेत. खंडणी आणि हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांत १५ वर्षांपासून तो पोलिसांना हवा होता.

पुजारी याला दक्षिण आफ्रिकेत अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जानेवारी २०१९ मध्ये सेनेगलच्या ताब्यात देण्यात आले होते. सेनेगल प्रशासनाने पुजारी याला भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. सूत्रांनुसार, एनआयए, सीबीआय आणि रॉचे अधिकारी आता पुजारी याची चौकशी करतील. पुजारी याच्याविरुद्ध खंडणी आणि हत्यांसह २०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड आणि दहशतवाद्यांचा म्होरक्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुख्यात दाऊद इब्राहिमसाठी पुजारी एकेकाळी काम करत होता. मात्र, नंतर तो फरार झाला.

अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या रवी पुजारीला २२ जानेवारीला अटक करण्यात आल्याची माहिती तपास यत्रणांनी दिलीत्याच्या अटकेची माहिती २६ जानेवारीला भारतीय दुतावासाला देण्यात आलीरवी पुजारीवर खंडणीअपहरणखूनब्लॅकमेल आणि फसवणुकीचे आरोप आहेतत्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे  रवी पुजारी ऑस्ट्रेलियाला राहत असल्याचा पोलिसांना संशय होताभारतीय गुप्तचर यंत्रणा सतत रवी पुजारीवर लक्ष ठेवून होत्यापण तो पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फा सोमध्ये लपला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होतीतेव्हापासून तपास यंत्रणा त्याच्या मागावर होते.  रवी पुजारीने अनेक अंडरवर्ल्ड डॉनसोबत काम केलं आहे. मात्र कालांतरानं कुणाशीही न जमल्यानं त्यानं दोन दशकांपूर्वी स्वत:ची टोळी उभी केली. मुंबईत दहशत निर्माण करण्यासाठी त्यानं पहिल्यांदा बॉलिवूडला टार्गेट केलं. दिग्दर्शक महेश भट यांच्या घरावर गोळीबार केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. जानेवारीतच मुंबई पोलिसांनी रवी पुजारीच्या दोन हस्तकांना अटक केली होती. विलिअम रॉड्रिक्स आणि आकाश शेट्टी अशी त्यांची नावं आहेत. या दोघांवर मुंबई पोलिसांनी या वर्षातला पहिला मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरातमध्ये अनेक गुन्हे

रवी पुजारीवर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी व अन्य अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कर्नाटकात बेंगळुरूमध्ये ३९, मंगळूरमध्ये ३६, उडुपीमध्ये ११, तर म्हैसूर, हुबळी-धारवाड, कोलार आणि शिवमोगामध्ये प्रत्येकी एकेक गुन्हा पुजारीविरुद्ध दाखल आहे. मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये पुजारीविरुद्ध ४९ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यातील २६ गुन्हे मोक्काखाली दाखल झालेले आहेत. गुजरातमध्ये त्याच्याविरुद्ध खंडणी प्रकरणी ७५ गुन्ह्यांची नोंद आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा