दाऊद इब्राहिम वापरतोय बिट कॉईन्स? तपास यंत्रणांना चकवा देण्यात यशस्वी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी चक्क बिट कॉईन्सचा वापर करत असल्याचं समोर आल्याने तपास यंत्रणा देखील चकित झाल्या आहेत. बिट कॉईन्स हे एक तांत्रिक चलन (डिजिटल करन्सी) असून त्यांच्यावर कोणत्याही देशाचं नियंत्रण नसल्याने त्यांच्या व्यवहारांवर आळा घालणे तपास यंत्रणांना अशक्य असल्याचं समजतंय.

दाऊद इब्राहिम वापरतोय बिट कॉईन्स? तपास यंत्रणांना चकवा देण्यात यशस्वी
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी चक्क बिट कॉईन्सचा वापर  करत असल्याचं समोर आल्याने तपास यंत्रणा देखील चकित झाल्या आहेत. बिट कॉईन्स हे एक तांत्रिक चलन (डिजिटल करन्सी) असून त्यांच्यावर कोणत्याही देशाचं नियंत्रण नसल्याने त्यांच्या व्यवहारांवर आळा घालणे तपास यंत्रणांना अशक्य असल्याचं समजतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊदचा भाऊ इकबाल कासकरने दाऊद बिट कॉईन्समध्ये डील करत असल्याचा गौप्य्स्फोट केला आहे.


बिटकॉईन्समध्ये दाऊदचे हजारो कोटी रुपये?

इक्बाल कासकरने दिलेल्या माहिती नुसार, दाऊदने तब्बल १५०० बिट कॉईन्स विकत घेतले असून त्याचा वापर हा मुख्यत्वे रिअल इस्टेट, ड्रग्स आणि हत्यारांच्या तस्करीसाठी केला जातोय. एका बिट कॉइनची किंमत हि १५ हजार अमेरिकन डॉलरच्या घरात असून १५०० बिटकॉईन्सची किंमत कित्येक अब्ज रुपयांच्या घरात असल्याचं समजतंय.


कसा वापर होणार बिटकॉईन्सचा?

तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी दाऊद हा रुपये आणि डॉलरच्या पर्यायाचा विचार करत होता आणि आता त्याने बिटकॉईन्समध्ये व्यवहार करण्यास सुरवात केल्याचं समजतंय. या आधी दाऊदला हवाला मार्फत पैसे पोहोचवले जात होते. मात्र, तपास यंत्रणांनी दाऊदला लक्ष केल्यानंतर अशा प्रकारे हवालाने पैसे पोहोचवणं धोक्याचं असल्याने, दाऊद एका सोप्या पर्यायाच्या शोधात होता. बॉलिवूड, रिअल इस्टेट, शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर दाऊदचा पैसा असल्याचा नेहमीच दावा केला जातो. आता त्यात दाऊद हे बिटकॉईन्सचे पैसे कसे वळवतो? याकडे तपास यंत्रणांचे लक्ष लागले आहे.


काय आहेत बिट कॉईन्स?

बिट कॉईन्स ही एक डिजिटल करन्सी असून तिच्यावर कोणत्याही देशाच्या संस्थांचं बंधन नाही. सातोशी नाकामाटो नावाच्या एका अज्ञात इसमाने किंवा एका ग्रुपने या डिजिटल चलनाचा शोध लावला होता. २००९ पासून हे बिट कॉईन्स चलनात आहेत. सध्याच्या घडीला एका बिटकॉईनची किंमत ही १५ हजार डॉलरच्या घरात आहे.



हेही वाचा

स्वत:च्याच मुलामुळे दाऊद का झाला निराश?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा