मालमत्ता लिलावाने दाऊद भडकला, १९९३ सारख्या ब्लास्टची दिली धमकी


मालमत्ता लिलावाने दाऊद भडकला, १९९३ सारख्या ब्लास्टची दिली धमकी
SHARES

अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांची विक्री दाऊदच्या हस्तकांना अजिबात रूचलेली नसून या विक्रीमुळे दाऊद स्वत:देखील भडकल्याचं वृत्त आहे. दाऊदच्या मुंबईतील मालमत्तांची विक्री होताच धमक्यांच्या सत्राला सुरुवात झाली आहे. मंगळवारी रात्री दाऊदचा हस्तक असलेल्या उस्मान चौधरीने एका वृत्तवाहिनीला फोन करून धमकी दिल्याचं समजतंय.

'दाऊदची मालमत्ता कोणी ताब्यात घेतली, तर मुंबईत १९९३ बॅाम्ब ब्लास्टची पुनरावृत्ती करू', असं यावेळी ऊस्मान चौधरीने बजावलं आहे. दाऊदच्या हस्तकांकडून धमकी येताच मुंबई पोलीस देखील सतर्क झाले आहेत.


साडे अकरा कोटींना झाला लिलाव

मंगळवारी चर्चगेटच्या आयएमसीमध्ये मुंबईतील तीन मालमत्तांचा लिलाव करण्यात आला, ज्यात हॅाटेल रौनक अफरोज, शबनम गेस्ट हाउस आणि डांबरवाला बिल्डिंग यांचा समावेश होता. या तिन्ही मालमत्ता सैफी बुरहाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने तब्बल साडे अकरा कोटी रूपयांना विकत घेतल्या.

मालमत्तांच्या लिलावात एसबीयुटी, हिंदू महासभा सारख्या अनेकांनी भाग घेतला होता. मात्र, या लिलावात दाऊदच्या साथीदारांनी सहभाग न घेतल्याने सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले होते.


पूर्वीही आल्या होत्या धमक्या

याआधी २००२ आणि २०१५ साली अशाच प्रकारे दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता. त्यावेळी स्वत: दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम आणि छोटा शकीलने दाऊदची मालमत्ता कुणाच्याही हातात जाऊ नये, म्हणून फर्मान काढले होते. यावेळी बोली लावणाऱ्या अनेकांना धमक्या देखील आल्या होत्या.



हेही वाचा

'तय्यारी शुरू करो!', दाऊद आखतोय मुंबईवर हल्ल्याचा कट?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा