अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी सेनेगलमधून फरार?

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी आफ्रिकन देश सेनेगलमधून फरार झाल्याचं वृत्त आहे. २१ जानेवारीला पुजारीला अटक झाली होती. सेनेगल न्यायालयाने जामीन मंजूर करताच तुरूंगाबाहेर आलेल्या पुजारीने पळ काढल्याचं भारतीय गुप्तचर यंत्रणाचं मत आहे.

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी सेनेगलमधून फरार?
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी आफ्रिकन देश सेनेगलमधून फरार झाल्याचं वृत्त आहे. २१ जानेवारीला पुजारीला अटक झाली होती. सेनेगल न्यायालयाने जामीन मंजूर करताच तुरूंगाबाहेर आलेल्या पुजारीने पळ काढल्याचं भारतीय गुप्तचर यंत्रणाचं मत आहे.

बनाव खटला

भारतीय तपास यंत्रणांच्या हाती लागू नये म्हणून पुजारीने सेनेगलमध्ये स्वत:वरच बनावट फसवणुकीचा खटला दाखल केला होता. सेनेगल न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करताना जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत देश सोडण्यास मनाई केली होती. तरीही पुजारीने पळ काढल्याचं म्हटलं जात आहे. सेनेगलला लागूनच बुर्किना फासो, माली आणि आयवरी कोस्टसारखे देश आहेत. त्यामुळेच पुजारीला पळून जाणं सोपं झाल्याचा तर्क लावला जात आहे.

नागरिकत्व मिळालं

सेनेगलमध्ये राहत असलेल्या रवी पुजारीला भारतात परत आणण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणा प्रयत्न करत होती. सेनेगलला येण्याआधी पुजारी बर्किना फासो इथं राहत होता. त्याला बुर्किना फासो देशाचं नागरिकत्व मिळाल्याचाही दावा केला जात आहे. त्यांने आपलं नाव बदलून अँथनी फर्नांडीस ठेवल्याचं म्हटलं जात आहे.

रेड काॅर्नर नोटीस

रवी पुजारीविरोधात भारतात २०० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही काढली आहे. शिवाय २ अधिकाऱ्यांची टीम मुंबईहून सेनेगलला रवाना झाल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.  हेही वाचा-

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: पायलनं लेखी तक्रार केलेली नाही

अखेर अभिनेता करण ओबेराॅयला जामीनRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा