आयसिसच्या 'या' संशयित दहशवाद्याला मुंबई विमानतळावरून अटक


आयसिसच्या 'या' संशयित दहशवाद्याला मुंबई विमानतळावरून अटक
SHARES

आयसिसच्या संशियत दहशतवाद्याला शनिवारी रात्री मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. अबू जैद (36) नावाच्या या संशयित दहशतवादयाला यूपी एसटीएफने राज्य एटीएसच्या मदतीने अटक केली आहे.

एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेश एसटीएफ आणि राज्य एटीएसने आयसिसचे एक मॉड्यूल पकडले होते. यावेळी एकूण सहा राज्यात छापे टाकून चौघांना अटक करण्यात आली. मुंब्रावरून नाजिम शमशाद अहमद, झिशान उर्फ गाझी बाबा, फैजान उर्फ मुफ्ती आणि इथेशाम उर्फ पिंटू नावाच्या चौघांना अटक करण्यात आली होती. हे चौघे दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यावेळी यूपी एसटीएफने दिली होती. या अबू जैदकडून आदेश घेत असल्याचे समोर येताच तपास यंत्रणांनी अबूविरुद्ध लूक आऊट नोटीस काढली होती. शनिवारी अबू सौदी अरेबियावरून मुंबईला उतरताच एमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अबूची माहीती तात्काळ तपासयंत्रणाना देताच त्याला विमानतळावरच पकडण्यात आले.


मेसेजिंग अॅपवरून साधायचा संवाद

भारतातील आपल्या सहकाऱ्यांशी संपर्कात रहाण्यासाठी अबू हा थ्रिमा नावाच्या अतिशय सुरक्षित अॅप वापरायचा. हे अॅप आपल्या यूजर्सना एंड टू एंड सुरक्षा देत असून त्याची सुरक्षा भेदणे कठीण असल्याचे सुरक्षा यंत्रणानी मान्य केले आहे. सध्या यूपी एसटीएफने अबूला अटक केली असून त्याच्याबद्दल अनेक खुलासे करणार अशी, शक्यता आहे.हेही वाचा - 

मुंबई विमानतळावर आता 36 कोटींचे कोकेन जप्त


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा