आलिया भट्टला जीवे मारण्याची धमकी, आरोपी गजाआड

 Juhu
आलिया भट्टला जीवे मारण्याची धमकी, आरोपी गजाआड

मुंबई - चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांना खंडणीसाठी धमकी देणाऱ्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. संदीप साहू असे या व्यक्तीचेे नाव असून, त्याने महेश भट्ट यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी  मागितली होती. 26 फेब्रुवारी रोजी त्याला धमकीचा कॉल आला होता. या प्रकरणी मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात महेश भट्ट यांच्या सांगण्यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. संदीप साहू याने महेश भट्ट यांच्याकडे 50 लाखांची मागणी केली होती. तसेच मागणी पूर्ण न केल्यास मुलगी आलिया भट्ट हिला जिवे मारण्याची धमकी देखील त्याने दिली होती. अखेर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला गुरुवारी सकाळी बेड्या ठोकल्या.गेल्या काही दिवसांपासून भट्ट यांना सतत धमकीचे फोन आणि मेसेजेस येत होते. हा कोणाचा तरी खोडसाळपणा असेल असे समजून भट्ट यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. पण हा कॉलर उत्तर प्रदेशातील एक कुख्यात गँगस्टर असल्याचे समोर येताच त्यानी तात्काळ जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

Loading Comments