गेल्या ६ वर्षांत मुंबईतून १९,९०७ गाड्या चोरीला

मुंबईच्या रस्त्यांवर सद्यस्थितीत ७० लाख गाड्या धावत असून ही संख्या सातत्याने वाढत आहे. गाड्यांच्या वाढत्या संख्येसोबत वाहनचोरांचीही चांदी होऊ लागली आहे. आरटीआय कार्यकर्ते अहमद शेख यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत मागील ६ वर्षांत ५३६ कोटी ६५ लाख ७७ हजार १५९ रुपयांच्या गाड्यांची चोरी झाली आहे.

गेल्या ६ वर्षांत मुंबईतून १९,९०७ गाड्या चोरीला
SHARES

मुंबईच्या रस्त्यांवर सद्यस्थितीत ७० लाख गाड्या धावत असून ही संख्या सातत्याने वाढत आहे. गाड्यांच्या वाढत्या संख्येसोबत वाहनचोरांचीही चांदी होऊ लागली आहे. आरटीआय कार्यकर्ते अहमद शेख यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत मागील ६ वर्षांत ५३६ कोटी ६५ लाख ७७ हजार १५९ रुपयांच्या गाड्यांची चोरी झाली आहे. यापैकी पोलिसांना केवळ ७४ कोटी ६० लाख ९ हजार ३२१ रुपयांच्या गाड्या पुन्हा मिळवण्यात यश आलं आहे.  


किती किंमतीच्या गाड्या?

शेख यांनी २०१३ ते २०१८ दरम्यान मुंबईतून चोरी झालेल्या गाड्यांची संख्या तसंच किंमतीबाबत माहिती मागवली होती. त्यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे माहिती अधिकारी आणि सहायक आयुक्तांनी उत्तर दिलं. त्यानुसार मुंबईत २०१३ ते २०१८ दरम्यान एकूण १९ हजार ९०७ गाड्यांची चोरी झाली असून या गाड्यांची किंमत ५३६ कोटी ६५ लाख ७७ हजार १५९ एवढी आहे. या ६ वर्षांमध्ये मुंबई पोलिसांना फक्त ५४६२ गाड्या हस्तगत करण्यातच यश आलं. चोरीला गेलेल्या वाहनांच्या तुलनेत ही टक्केवारी केवळ २१ टक्के एवढी आहे. 


कडक कारवाईची गरज

आरटीआय कार्यकर्ता अहमद शेख यांच्या मते, मुंबईतून गाड्या चोरी करणाऱ्यांमध्ये आंतरराज्यातील टोळीचा समावेश आहे. चोरीच्या गाड्यांना नेपाळमध्ये नेऊन विकलं जात आहे. तसंच काही गाड्या भंगारात देखील काढल्या जात आहेत. पोलिसांनी गाड्या चोरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची गरज आहे. तसंच शहरात जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. 


२०१३ ते २०१८ दरम्यानची आकडेवारी

वर्षचोरी झालेल्या गाड्याहस्तगत केलेल्या गाड्या
2013
3789- 62,13,43,556 रु.

859-  14,47,14,612 रु.

2014
3474- 52,26,07,084 रु.
906- 14,44,98,452 रु.
2015
3311- 40,45,71,864 रु.
840- 11,07,67,314 रु.
2016
3118- 38,40,75,485 रु.
861- 11,91,23,316 रु.
2017
3012- 29,86,13,601 रु.
935- 10,49,49,427 रु.
2018
3203- 31,53,65,569 रु.
1331- 13,09,56,200 रु.



हेही वाचा-

कारागृह कैद्यांनी ओव्हरलोड; क्षमतेपेक्षा १३४ टक्के जास्त कैदी

कुर्ल्यामध्ये घराचा भाग कोसळून एकाचा मृत्यू, १ जखमी


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा