कारागृह कैद्यांनी ओव्हरलोड; क्षमतेपेक्षा १३४ टक्के जास्त कैदी

कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवण्यात येत असल्याने सोयी - सुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. परिणामी कैदी विविध आजारांनी ग्रासलेले आहेत.

कारागृह कैद्यांनी ओव्हरलोड; क्षमतेपेक्षा १३४ टक्के जास्त कैदी
SHARES

राज्यातील कारागृहांमध्ये दिवसेंदिवस कैद्यांची संख्या दुप्पटीने वाढत आहे. क्षमतेपेक्षा १३४ टक्के कैदी जास्त असल्यामुळे कारागृहात  कैद्यांना ठेवण्यासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. मध्यवर्ती कारागृहांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. तर काही जिल्हा कारागृहांत क्षमतेच्या दुप्पट कैदी ठेवले जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कारागृहांची क्षमता कधी वाढविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


कारागृहांमध्ये ३५,७४४ कैदी

राज्यात ९ मध्यवर्ती, तर ५१ वर्ग १, , ३ ची जिल्हा कारागृहे आहेत. यात १९ खुली कारागृह, २ महिला कारागृह, १ खुली वसाहत, १ किशोर सुधारगृह आणि कारागृह रुग्णालय यांचा समावेश आहे. एकूण ६० कारागृहांची कैदी ठेवण्याची क्षमता आता संपुष्टात आली आहे. या कारागृहांमधील ३१ मार्चअखेरीस कैद्यांची अधिकृत क्षमता २४ हजार ३२ इतकी आहे. मात्र त्यात प्रत्यक्षात राज्यातील कारागृहांमध्ये ३५ हजार ७४४ इतके कैदी ठेवणे भाग पडत आहे. त्यात ३४ हजार १६२ पुरुष कैद्यांची संख्या, तर १,५८२ महिला कैद्यांचा समावेश आहे.


माहिती अधिकारातून उघडकीस

कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवण्यात येत असल्याने सोयी - सुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. परिणामी कैदी विविध आजारांनी ग्रासलेले आहेत. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहाची क्षमता ८०४ इतकी आहे. मात्र त्यात ३,३११ कैदी ठेवण्यात आले आहेत. येरवड्याची क्षमता २,४४९ असून येथे ५,४५२ कैदी आहेत. ठाणे मध्यवर्ती कारागृहात १,१०५ कैदी ठेवले जाऊ शकतात, पण सध्या येथे ३,१९९ कैदी आहेत. औरंगाबादमध्ये ५७९ ऐवजी १,१६४ कैदी ठेवले आहेत. नागपूर मध्यवर्ती कारागृहाची कैद्यांची क्षमता १,८४० असताना २,२७७, तर अमरावती मध्यवर्ती कारागृहात ९७३ या क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे १,१३१ कैदी असल्याचे  माहितीच्या अधिकाराद्वारे मागवलेल्या माहितीतून पुढे आले आहे.


कर्मचारी वर्ग अपुरा

मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कैद्यांच्या तुलनेत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिपाई, हवालदार व अधिकारी हा तुरुंग कर्मचारी वर्ग अपुरा आहे. कारागृह उपमहानिरीक्षक, मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहांचे अधीक्षक, तुरुंग अधिकारी, सुभेदार, हवालदार, रक्षक आणि प्रशासकीय पदे मिळून कारागृह विभागात सुमारे ५ हजार ६४ पदे मंजूर असून ३ हजार ७४९ पदे भरण्यात आली आहेत. अजूनही १,३१३ पदे रिक्त आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना महिन्यातून दोनच दिवस साप्तााहिक सुट्ट्या मिळत आहेत. तर त्यांना अनेकदा १६ ते १८ तास ड्युटी करावी लागत आहे. रात्रपाळीचे तासही खूप असतातयाचा फटका कैद्यांना बसत आहे.



हेही वाचा -

कुर्लामध्ये घराचा भाग कोसळून एकाचा मृत्यू, १ जखमी

रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून १८ जणांची ७० लाखांना फसवणूक





Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा