कुर्ल्यामध्ये कचऱ्याचा ढीग घरावर कोसळला, एकाचा मृत्यू, १ जखमी


कुर्ल्यामध्ये कचऱ्याचा ढीग घरावर कोसळला, एकाचा मृत्यू, १ जखमी
SHARES

कुर्ल्यात कचऱ्याचा ढीग एका घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी एक जखमी झाला आहे. अब्दुल रशीद कुरेशी (४८) असं मृताचं नाव आहे. तर रेहमादी (६५) ही महिला जखमी झाली आहे. जखमी महिलेवर सायन रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 


कुरेशी नगरमधील घटना

कुर्लातील कुरेशी नगरमध्ये ही दुर्घटना घडली. कुर्ला पूर्वेकडील कुरेशी नगरमध्ये पठाण चाळ ही एक मजली इमारत आहे. बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास या चाळीमधील एका घरावर कचऱ्याचा ढीग कोसळला. त्यात अब्दुल रशीद कुरेशी यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.  रेहमादी ही महिला जखमी झाली असून तिला तात्काळ सायन रूग्णालयात दाखल करण्यात आलं.



हेही वाचा-

रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून १८ जणांची ७० लाखांना फसवणूक

आंब्याच्या १०९ पेट्या परस्पर विकून देवगडच्या व्यापाऱ्याची फसवणूक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा