आंब्याच्या १०९ पेट्या परस्पर विकून देवगडच्या व्यापाऱ्याची फसवणूक

आरोपी अनिलने त्यांना व्यापाऱ्याकडे आंबे विकल्यानंतर तुमचे पैसे देऊ, असे सांगितले. त्याने सर्व पेट्या खाली उतरवल्या. यावेळी व्यापारी नसून तो दुपारी येणार असल्याचे अनिलने राणे यांना सांगितलं. तोपर्यंत राणे यांना जवळच्याच हॉटेलमध्ये तो जेवण्यासाठी घेऊन गेला. तेथे गेल्यानंतर दूरध्वनी आल्याचा बहाणा करून अनिल बाहेर पडला.

आंब्याच्या १०९ पेट्या परस्पर विकून देवगडच्या व्यापाऱ्याची फसवणूक
SHARES

 साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या 'अक्षय तृतीया'साठी बाजारात तयार आंब्याला मागणी वाढली असताना देवगडच्या एका आंबा बागायतदाराची आंब्याच्या १०९ पेट्यांची परस्पर विक्री करून फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बोरिवलीच्या कस्तुरबा मार्ग पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. 


फोनवरून मागणी

मूळचे देवगडचे राहणारे असलेले तक्रारदार कृष्णनाथ राणे हे त्या परिसरातील बागायतदारांचे आंबे मुंबईत विक्रीला आणतात. काही दिवसांपूर्वी कृष्णानाथ राणे यांच्या नातेवाईकाला आरोपीचा फोन आला. त्यावेळी त्याने शंभर किंवा त्यापेक्षा जास्त पेट्या उच्च प्रतीचा आंंबा मुंंबईतील व्यापाऱ्याला हवा असल्याची माहिती राणे यांना देत दुसरा आरोपी अनिल याचा फोन नंबर राणे यांना दिला. राणे यांनी अनिलला दूरध्वनी केला असता, त्याने शंभरहून अधिक आंब्यांच्या पेट्यांची आवश्‍यकता असल्याचं सांगितलं. त्यानुसार राणे यांनी गावातील इतर व्यापाऱ्यांकडील आंब्याच्या १०९ पेट्या मिळत असल्याचे अनिलला दूरध्वनी करून सांगितले. 


विक्रीनंतर पैसे देण्याचा बहाणा

दोघांमध्ये १ हजार ८०० रुपये प्रति पेटी असा व्यवहार ठरला. त्यानुसार राणे सोमवारी बोरीवली मार्केटमध्ये टेम्पो घेऊन आले. तेथे आरोपी अनिलने त्यांना व्यापाऱ्याकडे आंबे विकल्यानंतर तुमचे पैसे देऊ, असे सांगितले. त्याने सर्व पेट्या खाली उतरवल्या. यावेळी व्यापारी नसून तो दुपारी येणार असल्याचे अनिलने राणे यांना सांगितलं. तोपर्यंत राणे यांना जवळच्याच हॉटेलमध्ये तो जेवण्यासाठी घेऊन गेला. तेथे गेल्यानंतर दूरध्वनी आल्याचा बहाणा करून अनिल बाहेर पडला. बराच वेळ झाला, तरी अनिल आला नाही. त्यामुळे राणे यांनी अनिलला दुरध्वनी केला असता त्याचा दुरध्वनी बंद होता. त्यामुळे त्यांना संशय आला. 


सकाळीच पैसे घेतले

 बोरीवली मार्केटमध्ये जाऊन आंबे विक्री केलेल्या व्यापाऱ्याकडे चौकशी केली असता अनिलने सकाळीच आंब्याचे पैसे घेतल्याचे त्यांना समजले.  आपली फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर राणे यांनी तात्काळ बोरीवलीतील कस्तुरबा मार्ग पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 



हेही वाचा -

हिमालय पादचारी पूल दुर्घटनेप्रकरणी चौथी अटक

अभिनेता करण सिंग ओबेराॅय बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा