'या' स्टंटबाजांना वाटत नाही मृत्यूचे भय...

CST
'या' स्टंटबाजांना वाटत नाही मृत्यूचे भय...
'या' स्टंटबाजांना वाटत नाही मृत्यूचे भय...
See all
मुंबई  -  

मागील काही वर्षांमध्ये रेल्वेत स्टंटबाजी करताना अनेक तरूण प्राणांना मुकले आहेत. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने लोकल ट्रेनमधील स्टंटबाजी थांबवण्यासाठी बऱ्याच उपाययोजना केल्या. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले. पण स्टंटबाजीचे हे प्रकार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

हे सांगण्यामागचे कारण म्हणजे सध्या लोकलमधील स्टंटबाजीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत अाहे. त्यात चालत्या ट्रेमध्ये काही तरूण स्टंटबाजी करताना दिसत आहेत. व्हिडीओत 5 तरूणांचा ग्रुप दिसत असून हे सर्व तरूण अंदाजे 15 ते 20 वयोगटातील आहेत.


या व्हिडीओत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सोमवारी सायंकाळी 4 वाजता पनवेलकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये हे सर्व तरूण चढतात. त्यानंतर 2 डब्यांच्या गेटवर आळीपाळीने स्टंटबाजी करतात.

हे सगळे तरूण गेटला लटकलेले दिसतात. त्यापैकी कुणी चालत्या ट्रेनमधून रुळांनजीकच्या झुडुपांना पकडण्याचा प्रयत्न करतो, तर कुणी वीजेच्या खांबांना स्पर्श करतो. एवढेच नव्हे, तर गेटवर बसून पायांनीही स्टंटबाजी करताना हे तरूण या व्हिडीओत दिसतात.

प्रशासनाने सातत्याने स्टंटबाजीविरोधात जनजागृती करूनही या तरूणांना पोलीसच काय, तर स्वत:चा जीव गमावण्याचेही भय का वाटत नाही? असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.हे देखील वाचा -

चर्चगेट रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.