चर्चगेट रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी!

 Mumbai
चर्चगेट रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
Mumbai  -  

चर्चगेट रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन सकाळी 10 वाजून 44 मिनिटांनी रेल्वे हेल्पलाइनच्या 182 क्रमांकावर आल्याने एकच खळबळ उडाली. 


या निनावी फोननंतर मुंबईतील सगळ्याच रेल्वे स्टेशनची सुरक्षा वढवण्यात आली आहे. यावेळी "चर्चगेट स्टेशन बॉम्ब से उडा देंगे" अशी धमकी या अज्ञात व्यक्तीने फोन करुन दिली होती.

 


विशेष म्हणजे, गुरुवारी 13/7 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट हल्ल्याला 6 वर्ष पूर्ण होत असल्याने याचे गांभीर्य वाढले आहे. सध्या चर्चगेट स्थानकाची कसून तपासणी सुरू असून मुंबईतील इतर स्थानकांची देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.ट्विटरवर 'काळजीवाहू' ट्विट्स!

दरम्यान, ही बातमी बाहेर पसरताच ट्विटरवर काळजी व्यक्त करणारे ट्विट्स मोठ्या प्रमाणावर सुरु झाले. काहींनी मुंबईकरांना काळजी घेण्याचा सल्ला दिला, तर काहींनी अफवांवर विश्वास न ठेवण्याची सूचना केला.

हेही वाचा

13/7 बॉम्बस्फोट : 'त्यांना' जगण्यासाठी हवाय भक्कम आधार...

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषीला बिजनौरमधून अटक


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments