मुंबई बॉम्बस्फोटातील दोषीला बिजनौरमधून अटक


मुंबई बॉम्बस्फोटातील दोषीला बिजनौरमधून अटक
SHARES

गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाई करत टाडा कलमाखाली आरोप ठेवण्यात आलेल्या एका व्यक्तीला बिजनौर येथून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे नाव कादीर अहमद असून 1993 मधील मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी आहे.

1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटात टायगर मेमनद्वारे जामनगर येथे शस्त्रास्त्र आणि स्फोटके पुरवण्यात आली होती. त्यात या कादीरचाही समावेश असल्याची माहिती उघड झाली आहे. न्यायालयाने काढलेल्या वॉरंटच्या आधारावर गुजरात पोलिसांनी आरोपी कादीरला अटक केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश एटीएसचे वरिष्ठ पोलिस विश्वजीत सिंह यांच्या पथकाची मदत घेण्यात आली होती. सध्या उत्तर प्रदेश एटीएस आणि गुजरात पोलिस आरोपी त्याचा जबाब नोंदवून घेत आहेत.

याआधी मुंबईतल्या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाडा न्यायालायाने अबू सालेम, गँगस्टर मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहीर मर्चेंट, करिमुल्ला शेख आणि रियाज सिद्दीकी या सहा आरोपींना दोषी ठरवले तर, अब्दुल कय्युम नावाच्या आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. या सर्व आरोपींना सन 2003 ते 2010 या कालावधीत अटक करण्यात आली होती. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला मुख्य सूत्रधार याकूब मेमनला 30 जुलै 2015 रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. पण मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांच्यासह एकूण 27 आरोपी अद्यापही फरार आहेत.




हेही वाचा - 

असा मिळाला 257 जीवांना न्याय...

बॉम्बस्फोटातील दोषींना कठोर शिक्षा करा!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा