पोलिस कोठडीत तरुणाचा मृत्यू : खोटी माहिती देणाऱ्या प्रेमीयुगुलावर गुन्हा

त्याच्या गाडीची लाइट समोर अंधारात असलेल्या एका जोडप्यावर पडल्याने वाद झाला. त्यावेळी समोरील तरुणाने त्याच्या मित्रांना बोलवून विजयला मारहाण करण्यास सुरूवात केली.

पोलिस कोठडीत तरुणाचा मृत्यू : खोटी माहिती देणाऱ्या प्रेमीयुगुलावर गुन्हा
SHARES
वडाळा टीटी पोलिसांच्या कोठडीत अदखलपात्र गुन्ह्यात ताब्यात असलेल्या विजय सिंग या २६ वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर एकच वादंग उभे राहिले होते.  या गुन्ह्यात विजयला मारहाण करून त्याच्याविरोधात खोटी तक्रार देणाऱ्या जोडप्याविरोधातही पोलिसांनी आता गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रणव अशोक यांनी दिली. 

दिवाळीच्या निमित्ताने २७ ऑक्टोबर रोजी वडाळा परिसरात राहणारा विजय हा त्याच्या दोन भावांसोबत त्याच्या होणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी रात्री घराबाहेर पडला होता. ट्रक टर्मिनल येथे काही कारणास्तव त्याने दुचाकी थांबवली. त्यावेळी त्याच्या गाडीची लाइट समोर अंधारात असलेल्या एका जोडप्यावर पडल्याने वाद झाला. त्यावेळी समोरील तरुणाने त्याच्या मित्रांना बोलवून विजयला मारहाण करण्यास सुरूवात केली.  गस्तीवर असलेले पोलिस त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी विजय आणि त्याच्या दोन भावांना व समोरील तीन तरुणांना ताब्यात घेतले.

पोलिस ठाण्यात आल्यानंतर या तरुणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर काही वेळातच विजय सिंगच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्यामुळे त्याला तात्काळ सायन रुग्ण्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

जोडप्याने खोटी माहिती देत विजयला मारहाणही केल्याचे चौकशीत पुढे आले. या घटनेनंतर वडाळा टीटी पोलिस ठाण्यात खोटी माहिती दिल्याप्रकरणी जोडप्यावर आणि विजयला मारहाण केल्या प्रकरणी दोघांवर 341, 323, 504,506(2), 182, 211,34 भा.द.वी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिस अधिक तपास करत असून नागरिकांनी कायदा हातात न घेता शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.हेही वाचा -

धावत्या लोकलमध्ये स्टंट करणाऱ्याला ‘टिकटाँक फॅन’ अटक

४ वर्षात १०६ आरोपींचा तुरुंगात मृत्यू 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा