बनावट टिसी नंबरच्या मदतीनं वाहनांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बनावट टिसी नंबरच्या मदतीने नागरिकांना दुचाकी विकत, त्यांची फसवणूक करणार्या टोळीचा विक्रोळी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

बनावट टिसी नंबरच्या मदतीनं वाहनांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
SHARES

बनावट टिसी नंबरच्या मदतीनं नागरिकांना दुचाकी विकून, त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा विक्रोळी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मे. अर्चना मोटर्सतर्फेे अशा अडीच वर्षांत ३३० वाहनांची विक्री केल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे.


महिलेला अडवलं

घाटकोपर पूर्व परिसरात विक्रोळी वाहतूक विभागाकडून वाहतुकीचं नियोजन सुरू असताना, १६ फेब्रुवारी रोजी वाहतूक पोलिसांनी पंतनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेला अडवलं. गाडीचा मागील लेखाजोखा का तपासला असता. त्या दुचाकीवर तब्बल १ लाख २४ हजार रुपये एवढा दंड असल्याचं समजताच तरुणीलाही धक्का बसला. चौकशीत तिनं ८ दिवसांपूर्वी मे. अर्चना मोटर्सचे मालक महादेव काणेकर यांच्याकडून ६८ हजार रुपयांत ती खरेदी केल्याचं सांगितलं.


३३० वाहनांची विक्री

पोलिसांनी चौकशीसाठी दुचाकी ताब्यात घेतली. चौकशीत, एमएच ०३ टी.सी. ३३७ हा बनावट टी.सी. क्रमांक वापरून २०१६ पासून ३३० वाहने विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरटीओकडून हा टी.सी. क्रमांक हिंदुस्थान को-ऑप. बँक या वित्तपुरवठा करणाऱ्या कंपनीला दिलेला आहे.

याचा वापर अनेक दुचाकी डिलर्सनं स्वत:च्या फायद्यासाठी करीत गाड्यांची विक्री केली असल्याचं उघड झालं आहे. त्यानुसार अर्चना मोटर्ससह अन्य वितरकांविरुद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रोळीतील सहाय्यक पोलिस आयुक्त विनायक वस्त पोलिस निरीक्षक कुंडलीक कायगुडेे यांनी हे संपूर्ण प्रकरण बाहेर काढलं आहे.



हेही वाचा -

शालिनी ठाकरेंकडून उर्मिला मातोंडकरला ‘मनसे’ शुभेच्छा

डोंगरीतून १३५ किलो सोनं जप्त, भंगारातून तस्करीचा डाव फसला



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा