Advertisement

शालिनी ठाकरेंकडून उर्मिला मातोंडकरला ‘मनसे’ शुभेच्छा

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनं काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर उत्तर मुंबईतून तिला उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानिमित्तानं मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी फेसबुकवरून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शालिनी ठाकरेंकडून उर्मिला मातोंडकरला ‘मनसे’ शुभेच्छा
SHARES

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनं काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर उत्तर मुंबईतून तिला उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानिमित्तानं मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी फेसबुकवरून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच तिला देण्यात आलेल्या उमेदवारीचंही कौतुक केलं आहे.


काय म्हटलंय पोस्टमध्ये ?

शालिनी ठाकरे यांनी आपल्या फेसबुकवरू एक पोस्ट करून उर्मिला मातोंडकर हिच कौतुक केलं आहे. एक अभिनेत्री म्हणून तिनं आपला ठसा उमटवला आहे. तसंच अनेक चित्रपटात ती झळकली असून मिळालेल्या संधीचंही सोनं केलं आहे. काँग्रेसनं उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून तुझं नाव जाहीर केलंय. राजकारणात सक्रीय होण्याचा हा निर्णय तू निश्चितच संपूर्ण विचारांती घेतला असं त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. तसंच या निवडणुकीच्या निमित्ताने तुझ्यासारखं एक संवेदनशील व्यक्तिमत्व राजकारणात आल्याचा आम्हाला निश्चितच आनंद असल्याचं म्हणत महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना-समस्यांना आवाज फोडण्यासाठी तुझ्यामुळे मदत होईल, असा विश्वासही शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.


आता उर्मिला मातोंडकर हिचा सामना भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात होणार आहे. २०१४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये गोपाळ शेट्टी यांनी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांचा मोठ्या फरकानं पराभव केला होता.




हेही वाचा -

सचिननं घेतली शरद पवारांची भेट; कारण मात्र गुलदस्त्यात

ईशान्य मतदारसंघ रामदास आठवलेंसाठी सोडा - आरपीआय




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा