विवेक ओबेरॉयच्या मुंबईतील घरावर पोलिसांची छापेमारी

ड्रग्ज (drugs) प्रकरणात आता अभिनेता विवेक ओबेरॉयच्या (Vivek Oberoi) घरावरही धाड टाकण्यात आली आहे.

विवेक ओबेरॉयच्या मुंबईतील घरावर पोलिसांची छापेमारी
SHARES

ड्रग्ज (drugs) प्रकरणात आता अभिनेता विवेक ओबेरॉयच्या (Vivek Oberoi) घरावरही धाड टाकण्यात आली आहे. सँडलवूड ड्रग्ज प्रकरणात (sandalwood drug scandal) विवेकचा मेहुणा आदित्य अल्वाचं (Aditya Alva) नाव आहे.

आदित्य सध्या गायब असल्यानं आता त्याच्या तपासासाठी बंगळुरू पोलीस (bengaluru police) मुंबईत आले आहेत आणि त्यांनी विवेक ओबेरॉयच्या घरात तपास सुरू केला आहे.

विवेक ओबेरॉयच्या बायकोचा भाऊ आदित्य अल्वा हा बंगळुरू ड्रग्ज प्रकरणात आरोपी आहे. आदित्य हा कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. हाय प्रोफाइल पार्टीमधील तो एक लोकप्रिय चेहरा आहे. प्रकरण उघडकीस आल्यापासून आदित्य गायब आहे. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. तो विवेकच्या घरात असल्याची माहिती बंगळुरू पोलिसांना मिळाली. त्यामुळे बंगळुरू पोलीस मुंबईत आले.

आदित्य अल्वा गायब आहे. तो विवेक ओबेरॉयचा नातेवाईक आणि त्याच्या घरी आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे त्याचा तपास करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत, असं बंगळुरू पोलिसांनी सांगितलं. बंगळुरू पोलीस सर्च वॉरंट घेऊन विवेक ओबेरॉयच्या जुहूतील घरात पोहोचले. दोन पोलीस दुपारी एक वाजता विवेकच्या घरी दाखल झाले. तेव्हापासून त्याच्या घरात तपास केला जातो आहे.हेही वाचा

TRP Scam : रिपब्लिकचे सीएफओ एस सुंदरम यांची उद्या होणार चौकशी

काळजाचा ठोका चुकवणारी स्टंटबाजी, आता तरुणाला शोधतायेत पोलिस

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय