'ते' स्टंटबाज पोलिसांच्या ताब्यात

लोकल ट्रेनमध्ये स्टंट करणाऱ्या चौघांना वडाळा पोलिसांनी 24 तासात ताब्यात घेतलं आहे. यातील तीन जण कुर्ला रेल्वे पटरीजवळचे राहणारे आहेत. तर एक आरोपी मुंब्राचा राहणारा आहे.

'ते' स्टंटबाज पोलिसांच्या ताब्यात
SHARES

हार्बर मार्गावर चालत्या लोकल ट्रेनमध्ये स्टंट करणाऱ्या चौघांना वडाळा पोलिसांनी 24 तासांच्या आत ताब्यात घेतलं आहे. यातील तीघे कुर्ला रेल्वे ट्रॅकवर राहणारे आहेत. तर एक जण मुंब्र्याचा राहणारा आहे. मोहम्मद अली अमिर अली शेख उर्फ मम्मा (19), मोहम्मद जैयिद शेख मुमताझ उर्फ जावेद (19), रोहित गजानन चौरसिया (20) आणि शेहबाज मुहम्मद जावेद खान (18) अशी या आरोपींची नावं आहेत.


संपूर्ण प्रकार

हे चौघे तरुण सोमवारी हार्बर मार्गावरील लोकल ट्रेनने सीएसटीच्या दिशेने जात होते. दरम्यान चौघेही चुनाभट्टी ते जीटीबीनगर स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये वेगवेगळे स्टंट करू लागले. स्टंट करत असताना यातील एकाने स्थानकावर थांबलेल्या एका प्रवाशाचा मोबाइल हिसकावला. ज्या व्यक्तीचा त्यांनी मोबाइल हिसकावला, तो दिव्यांग असल्याचं कळतं.


चौघेही पोलिसांच्या ताब्यात

स्टंटबाजी करत असताना यांच्यातीलच एकाने सेल्फी घेत स्टंटबाजीचा व्हिडिओ शूट करून व्हायरल केला. त्या व्हिडिओची चर्चा रेल्वे आणि आरपीएफ पोलिसांमध्ये रंगू लागली. अखेर या स्टंटबाजांची गंभीर दखल घेत आरपीएफचे आयुक्त सचिन भालोदे यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी या आरोपींची संयुक्तरित्या चौकशी करून त्यांना कुर्ला परिसरातून ताब्यात घेतलं. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.


हेही वाचा -

वर्षभरात २२५ रेल्वे स्टंटबाजांवर कारवाई

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा