कार चोरणाऱ्या सराईत टोळीस अटक

 wadala
कार चोरणाऱ्या सराईत टोळीस अटक
कार चोरणाऱ्या सराईत टोळीस अटक
See all

वडाळा - वडाळा टिटी पोलिसांनी उच्चभ्रू सोसायटीतल्या पार्किंगस्थळावर पाळत ठेवून महागड्या कार चोरणाऱ्या टोळीला गजाआड केलंय. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांना या चोरट्यांना पकडण्यात यश आलं. उस्मान सैय्यद(43),रियाज अहमद मेहबूब खान(43) अशी या चोरांची नावं असून, टोळीतील रहिम खान आणि शकील हे दोन आरोपी फरार आहेत. या चोरट्यांकडून 8 नोव्हेंबर रोजी भक्तीपार्क सोसायटीतून चोरीला गेलेली कार नंबरप्लेट बदललेल्या अवस्थेत सापडली. 8 नोव्हेंबरला भक्तीपार्क सोसायटीतून लाखो रुपयांची रेनॉल्ड डस्टर कार चोरीस गेल्याची घटना घडली.

दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता चावीच्या सहाय्यानं कारचा दरवाजा खोलून एका चोरट्यानं कार घेऊन पोबारा केल्याचं दिसून आलं. घटनेची माहिती मिळताच वडाळा टी टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी परिसरातील सर्व सीसीफूटेजची पाहणी करण्याचा आदेश सह पोलीस निरीक्षक प्रकाश लिंगे यांना दिला. त्यानुसार विभागातील सर्व सीसीफूटेजची पाहणी केली असता रेनॉल्ड डस्टर कार पुण्याच्या दिशेने गेल्याचा सुगावा त्यांना लागला. तत्काळ पुणे शहर पोलिसांना वायरलेसवरून चोरीला गेलेली कार पुण्याच्या दिशेने येत असल्याची माहिती देण्यात आली.

Loading Comments