हाॅटेलांमध्येच चोरी करणाऱ्या वेटरचा देवनार पोलिसांकडून शोध सुरू

मनसुद हा देखील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे हाॅटेलमध्ये राहू लागल्यामुळे त्याने दोन दिवसात हाॅटेलबाबतची सर्व माहिती करून घेतली. १९ आॅक्टोबरच्या मध्यरात्री हाॅटेलमधील सर्व कर्मचारी झोपेत असताना मनसुदने इतर कर्मचाऱ्यांची १७ हजार रुपयांची रोकड अाणि मोबाइल घेऊन हाॅटेलमधून पळ काढला.

हाॅटेलांमध्येच चोरी करणाऱ्या वेटरचा देवनार पोलिसांकडून शोध सुरू
SHARES

मुंबईतल्या विविध हाॅटेलमध्ये नोकरीला राहून कालांतराने त्या हाॅटेलमध्येच चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीचा देवनार पोलिस शोध घेत आहेत. या आरोपीने स्वतःचे बनावट ओळखपत्र बनवले असून त्या ओळखपत्रावर तो नोकरी मिळवून हे कृत्य करत असल्याचं पोलिस तपासात उघडकीस अालं आहे.


पैसे, मोबाइल लंपास

देवनारमधील लाॅजिक हाॅटेलमध्ये १७ आॅक्टोबर रोजी मनसुद या नावाने हा आरोपी नोकरी मागण्यासाठी आला होता. कर्मचाऱ्यांची गरज असल्यामुळे हाॅटेलचे मालक मकदुम खान यांनी त्याला वेटरची नोकरी दिली. सुरूवातीचे दोन दिवस मनसुद चांगले काम करत होता. त्यामुळे मालकालाही त्याच्यावर विश्वास बसला. मनसुद हा देखील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे हाॅटेलमध्ये राहू लागल्यामुळे त्याने दोन दिवसात हाॅटेलबाबतची सर्व माहिती करून घेतली. १९ आॅक्टोबरच्या मध्यरात्री हाॅटेलमधील सर्व कर्मचारी झोपेत असताना मनसुदने इतर कर्मचाऱ्यांची १७ हजार रुपयांची रोकड अाणि मोबाइल घेऊन हाॅटेलमधून पळ काढला. 


सीसीटिव्हीत चोरी कैद

दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांना मनसुद न दिसल्याने त्याचा शोध घेण्यास सुरूवात झाली. त्याच्याशी संपर्क करण्यासाठी कर्मचारी मोबाइल शोधू लागले. मात्र, त्यांना त्यांचा मोबाइल सापडला नाही. हाॅटेलचे सीसीटिव्ही पाहिले असता मनसुदने सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाइल लंपास केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी हाॅटेल मालकाने देवनार पोलिस ठाण्यात मनसुदविरोधात गुन्हा नोंदवला अाहे. पोलिसांनी मनुसदबाबत चौकशी केली असता त्याने यापूर्वीही विविध हाॅटेलमध्ये अशा प्रकारे चोऱ्या केल्याचं पुढे आलं अाहे. 



हेही वाचा - 

ड्रग्ज प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

नशा बेतली जीवावर, कार अपघातात एकाच मृत्यू, दोन जखमी




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा